ब्रेकिंग

कोळपेवाडीच्या श्री क्षेत्र महेश्वर देवस्थान व माहेगाव देशमुखच्या अमृतेश्वर देवस्थानास ‘क’ वर्ग दर्जा मंजूर – आ.आशुतोष काळे

कोळपेवाडीच्या श्री क्षेत्र महेश्वर देवस्थान व माहेगाव देशमुखच्या अमृतेश्वर देवस्थानास ‘क’ वर्ग दर्जा मंजूर – आ.आशुतोष काळे

संपादक :- रवींद्र जगताप

कोपरगाव :- कोपरगाव विधानसभा मतदार संघातील अनेक तीर्थक्षेत्रांना आ. आशुतोष काळे यांनी क’ वर्ग दर्जा मिळवून दिला असून उर्वरित देवस्थानांना देखील ‘क’ वर्ग मिळवून देण्यासाठी त्यांचा पाठपुरावा सुरू होता. या पाठपुराव्यातून मतदार संघातील कोळपेवाडी व पंचक्रोशीतील अनेक गावांचे श्रद्धास्थान असलेल्या कोळपेवाडी येथील श्री क्षेत्र महेश्वर देवस्थानास व माहेगाव येथील श्री क्षेत्र अमृतेश्वर देवस्थानास ‘क’ वर्ग दर्जा मंजूर करण्यात आला असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिली आहे.

जाहिरात

मतदार संघातील कोळपेवाडी व पंचक्रोशीतील अनेक गावांचे श्रद्धास्थान असलेल्या कोळपेवाडी येथील श्री क्षेत्र महेश्वर देवस्थानास ‘क’ वर्ग दर्जा मिळावा व या तीर्थक्षेत्राचा विकास व्हावा अशी कोळपेवाडी ग्रामस्थ व भाविकांची मागणी होती. त्याच प्रमाणे माहेगाव देशमुख येथील श्री क्षेत्र अमृतेश्र्वर देवस्थानाचा देखील विकास व्हावा अशी माहेगाव देशमुख ग्रामस्थ व भाविकांची मागणी होती त्या मागणीची दखल घेवून आ. आशुतोष काळे यांनी कोळपेवाडी येथील श्री क्षेत्र महेश्वर देवस्थानास व माहेगाव देशमुख येथील श्री क्षेत्र अमृतेश्वर देवस्थानास ‘क’ वर्ग दर्जा मिळावा यासाठी शासन दरबारी प्रस्ताव दाखल करून त्याबाबत त्यांचा पाठपुरावा सुरू होता. त्या पाठपुराव्याला यश मिळाले असून गुरूवार (दि.१६) रोजी  जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत कोळपेवाडी येथील श्री क्षेत्र महेश्वर देवस्थानास व माहेगाव येथील श्री क्षेत्र अमृतेश्वर देवस्थानास ‘क’ वर्ग दर्जा देण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

 तसेच आ. आशुतोष काळे यांच्या पाठपुराव्यामुळे कोपरगाव मतदार संघाचा दुष्काळाग्रस्त तालुक्यांच्या यादीत समावेश झाला असून त्या पार्श्वभूमीवर कोपरगाव मतदार संघात दुष्काळाच्या देण्यात येणाऱ्या उपाय योजना व सोयी सुविधा तातडीने लागू करा. महावितरणचे पोल शिफ्टिंग व नवीन ट्रान्सफार्मर चे कामाकरिता निधी वाढून मिळावा, चासनळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या विकास कामांना निधी मिळावा, मतदार संघातील पुणतांबा ग्रामीण रुग्णालयाच्या संरक्षक भिंतीचे बांधकामासाठी आवश्यक निधीस मंजुरी मिळावी, सोलर हायमॅक्स मिळावे व ३०५४ व ५०५४ रस्त्याचे कामाकरिता निधी वाढवून मिळावा. कोपरगांव विधानसभा मतदार संघातील रब्बी हंगामातील १६३ गावांचा समावेश खरीप हंगामात करावा, कोपरगांव नगरपरिषद हद्दीतील कामांना महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाभियान,नागरी दलोतेत्तर योजना, व साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नागरी दलित बस्ती योजना अंतर्गत जिल्हा नियोजन विभागाकडून मंजूरी मिळावी, स्थानिक स्तर यंत्रणेमार्फत मौजे देर्डे  को-हाळे येथील गावांतर्गत साठा बंधाऱ्याचे कामास मंजुरी मिळावी, मौजे शिंगवे येथील गावांतर्गत साठा बंधाऱ्याचे कामास मंजुरी मिळावी,मतदार संघातील २१ गावांना शवदाहिनी मंजूर करावी, ३१ गावातील फिजिकल फिटनेस कम रिक्रिएशन इक्विपमेंट साहित्य मागणी प्रस्तावास मंजुरी मिळावी, कोपरगांव विधानसभा मतदार संघात अभ्यास केंद्र मंजूर करावे, वळूमाता प्रक्षेत्र, कोपरगांव येथील विकास कामास जिल्हा नियोजन विभाग अंतर्गत मंजुरी मिळावी तसेच कान्हेगांव येथील शेती महामंडळ जागेतील गट नं.९५ मधील विहीर या भागातील नागरिकांसाठी पिण्याचे पाण्यासाठी अधिग्रहण करण्यात यावी व मतदार संघातील विविध रस्त्यांच्या विकासासाठी व इतरही विकासकामांना जिल्हा नियोजन मधून जास्तीत जास्त निधी मिळावा अशा विविध मागण्या आ.आशुतोष काळे यांनी यावेळी केल्या आहेत. या सर्व मागण्यांना पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

या बैठकीसाठी खा. सदाशिव लोखंडे, खा. डॉ. सुजय विखे,आ.बबनराव पाचपुते,आ.प्राजक्त तनपुरे,आ. किरण लहामटे, आ.रोहित पवार,आ.लहू कानडे,आ. सत्यजित  तांबे, आ.किशोर दराडे, माजी आमदार नरेंद्र घुले,माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे,जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ,जिल्हा नियोजन अधिकारी दाते,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, जिल्हा पोलिस अधिक्षक राकेश ओला आदी उपस्थित होते.

सत्य एक्सप्रेस च्या व्हाँटसाँप ग्रुपवर सहभागी होण्यासाठी खालिल लिंक दाबा

https://chat.whatsapp.com/JDIn3cUoYZr2hiqqupN7RB

 

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे