विविध मागण्याचे आँल इंडिया किसान काँग्रेस कमिटीच्या वतिने तहसीलदार यांना निवेदन
विविध मागण्याचे आँल इंडिया किसान काँग्रेस कमिटीच्या वतिने तहसीलदार यांना निवेदन
संपादक:- रवींद्र जगताप
केंद्रातील भाजप व राज्यातील सरकार यांच्या गलथान कारभार व चुकीच्या धोरणामुळे दिवसेंदिवस वाढत चाललेली महागाई, बेरोजगारी, महिलां वरील वाढते अत्याचार, शेतकरी विरोधी धोरणे, सामाजिक द्वेश व जातीय दंगली आदी कारणामुळे राज्यातील जनता हैराण आहे. तर दुष्काळी परिस्थिती मुळे राज्यातील शेतकरी मोठया आर्थिक संकटात सापडला आहे त्यांचे जगणेच मुश्कील झाले आहे.नगर मनमाड रस्त्याचे काम मागील पंधरा सोळा वर्षापासून रखडलेले आहे त्यामुळे हजारो लोकांचे प्राण गेले, अनेकजण अपंग झाले. नगर मनमाड रस्त्याचे काम नविन ठेकेदाराला देवून त्वरीत पूर्ण करण्यात यावे.


तसेच राज्यात अंमली पदार्थाची (ड्रग्ज) तस्करी व खुलेआम विक्री मोठ्या प्रमाणात सुरू आहे. यामुळे तरूणांचे जीवन विशेषतः विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. याविषयी पालक वर्गामध्ये फार मोठी चिंता निर्माण झाली आहे. मात्र सरकार या बाबीकडे तीळमात्र लक्ष द्यायला वेळ नाही. या सर्व बाबीमुळे जनतेच्या मनात आक्रोश आहे.यावर शासनाने लक्ष केंद्रित करुन कारवाई करावी.साखर कारखान्यांनी सभासदांना मोफत साखर वाटप करावी.सर्व प्रकारच्या पिक विम्याची १०० टक्के रक्कम तात्काळ शेतक-यांना मिळावी.गंगापुर, दारणा, भंडारदरा, निळवंडे, मुळा, नांदुर मधमेश्वर या धरणातुन जायकवाडीला पाणी सोडू नये,नगर मनमाड रस्त्याचे काम त्वरीत चालु करावे,सोयाबीन, कापूस, धान या पिकांसह सर्व पिकांचे हमीभाव खरेदी केंद्र त्वरीत सुरू करावे.अंमली पदार्थाच्या तस्करी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी तसेच अंमली पदार्थांचा नायनाट करावा.घरगुती वापरातील गॅस, डिझेल व पेट्रोलच्या वाढलेल्या किंमती कमी कराव्यात. नैराश्यात अडकलेल्या राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरूणांसाठी तातडीने मोठ्या प्रमाणात नोकरभरती करण्यात यावी.राज्यातील जनतेची जातनिहाय जनगणना करून सर्व प्रकारच्या मागासवर्गांना आरक्षण लागू करावे. कोपरगांव तालुक्यातील रस्ते निकृष्ट दर्जाचे झाले आहेत तालुक्यात एकही रस्ता म्हणण्याचे लायकीचे राहिले नाही. रस्त्यात खडडा कि खडडात रस्ता याची शासनाने गंभिर नोंद घ्यावी. बोगस काम करणारांचे नाव ब्लॅकलिस्टमध्ये समाविष्ट करावे. खातेनिहाय चौकशी करावी.अतिवृष्टीचे शेतक-यांचे नावावर पैशे जमा झाले नाही त्याची सखोल चौकशी करून पैशे जमा करण्याची कार्यवाही करावी अशा विविध मागण्याचे निवेदन १६ नोव्हेंबर २०२३ रोजी कोपरगाव तहसीलदार भोसले साहेब यांना आँल इंडिया किसान काँग्रेस कमिटीच्या वतीने विजय जाधव जिल्हा उपाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले आहे. याप्रसंगी नितिन शिंदे,विकास आढाव,विठ्ठल असणे,अंबादास वंडागळे,अभिजित आव्हाड,अनिल गायकवाड, विलास रक्ताटे आदीच्या या निवेदनावर सह्या आहेत


