सामाजिक

चर्मकार समाज बांधवानी राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या राष्ट्रीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरात सहभागी व्हावे- अशोकराव कानडे

चर्मकार समाज बांधवानी राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या राष्ट्रीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरात सहभागी व्हावे- अशोकराव कानडे

माजी समाजकल्याण मंत्री बबनरावजी घोलपनाना यांचे अध्यक्षतेखाली शिबिराचे आयोजन

संपादक :- रविंद्र जगताप

कोपरगाव (प्रतिनिधी) राष्ट्रीय चर्मकार महासंघ ,भारतीय दलित साहित्य अकादमी व रचना सोशल ऑफीसर असोसिएशन च्या वतीने सामाजिक कार्य करणारे सक्रीय कार्यकर्ते व राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे पदाधिकारी यांचे दोन दिवसांचे निवासी प्रशिक्षण शिबिर श्री स्वामी समर्थ मागासवर्गीय महिला सहकारी सूतगिरणी घोटी -सिन्नर रोड ज्योती स्ट्रक्चर कंपनी मागे उभाडे तालुका इगतपुरी जि नाशिक येथे दिनांक ८ व ९ एप्रिल रोजी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी मंत्री बबनरावजी घोलपनाना यांचे अध्यक्षतेखाली होत असुन समाजातील सर्व जेष्ठ पदाधिकारी,सक्रिय कार्यकर्ते, युवक-युवती ,महिला यांचे सह समाजातील शिक्षक डॉक्टर इंजिनिअर सर्वांनी सहभागी होऊन लाभ घ्यावा असे आवाहन राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे अहमदनगर उत्तरचे जिल्हाध्यक्ष तथा माजी पंचायत समिती सदस्य अशोकराव कानडे यांनी केले आहे

शिबिरासाठी प्रमुख पाहुणे म्हणुन अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष पी एल पुनिया,अखिल भारतीय दलित साहित्य अकादमीचे अध्यक्ष सोहनपाल सुमनाक्षर ,राज्यसभा सांसद सत्यनारायण जठीयाजी, रचना ऑफीसर्स सोशल असोसिएशनचे डॉ विठ्ठल दांडगे डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक निर्माण समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष इन्द्रेश गजभिये या दिल्लीतील वरीष्ठ नेत्यांसह राष्ट्रीय सल्लागार पंढरीनाथ पवारसाहेब,महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष माधवराव गायकवाड चर्मकार समाजजातील सर्व आजी माजी आमदार खासदार यांचे उपस्थितीत हे शिबीर होणार आहे या शिबिरात सहकार तसेच शासनाच्या समाजकल्याण विभागाच्या विविध योजनांची माहिती,सूतगिरणीची यशोगाथा, लिडकॉमचे बजेट व चर्मकार बांधवांसाठी असणाऱ्या विविध योजनांची माहिती, खादीग्रामोद्योगच्या विविध योजनांची माहिती मागासवर्गीय युवकांना उद्योग धंद्यासाठी उपलब्ध असलेल्या संधी मागासवर्गीयांच्या संरक्षणासाठी असलेल्या ॲट्रॉसिटी कायद्यातील तरतुदी तसेच क्रांतीकारी संत शिरोमणी गुरु राविदासजी महाराज यांचे क्रांतिकारी जिवन अशा अनेक विषयांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन या शिबिरात होणार आहे राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या माध्यमातून माजी मंत्री बबनरावजी घोलप यांच्या नेतृत्वाखाली समाजातील कोणत्याही घटकावर अन्याय झाल्यास पदाधिकारी देशभर अन्यायाविरुद्ध लढत पीडितांना न्याय मिळवून देत असतात यापुढे समाजाला योग्य दिशा देण्याचे काम या शिबिराच्या माध्यमातून होणार असुन अहमदनगर जिल्ह्यात समाजाचे जेष्ठ नेते माजी आमदार भाऊसाहेब कांबळेसाहेब तसेच उत्तर विभागीय अध्यक्ष मा दिलीपराव कानडे यांचे मार्गदर्शनाखाली अँड संतोषजी कांबळे, युवा जिल्हाध्यक्ष दत्ता दुशिंग ,महिला आघाडी अध्यक्ष मनीषाताई पोटे यांचेसह नेवासा ,श्रीरामपूर, कोपरगाव, राहाता, संगमनेर, अकोला असे सर्व तालुका अध्यक्ष व जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी यांना सोबत घेऊन जास्तीत जास्त संख्येने समाजबांधव शिबिरात सहभागी करुन घेणे बाबतीत नियोजन सुरु असल्याचे चर्मकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष अशोकराव कानडे यांनी सांगितले आहे

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे