आत्मा मालिक हॉस्पिटल येथे दोन वर्षाच्या बाळाची अवघड शस्त्रक्रीया यशस्वीरीत्या संपन्न
आत्मा मालिक हॉस्पिटल येथे दोन वर्षाच्या बाळाची अवघड शस्त्रक्रीया यशस्वीरीत्या संपन्न
दोन वर्षाच्या प्रतीक वर आत्मा मालिक हॉस्पिटल मध्ये हायपोस्पोडीएस नावाची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली हायपोस्पोडीएस ही मुलांमध्ये लघवीच्या जागेवर आढळणारी एक जन्मतः विकृती असते मुक्काम पोस्ट पाळशिंगल तालुका-जिल्हा बीड प्रदीप डामरे यांचा मुलगा प्रतीक डांबरे यावर ही यशस्वी शस्त्रक्रिया डॉक्टर सतीश कापडणीस सर(pedatrics surgeon) यांनी आत्मा मालिक हॉस्पिटलमध्ये पार पाडली सर्जरी बद्दल कापडणीस सरांनी रुग्णाच्या कुटुंबीयांना मार्गदर्शनही केले व त्यांना भावनिक आधारही दिला सदरची शस्त्रक्रिया राज्य शासनाच्या महात्मा ज्योतिराव जन आरोग्य फुले योजना अंतर्गत झाली असून या शस्त्रक्रियेसाठी व या शस्त्रक्रियेला लागणाऱ्या औषधांसाठी कुठलीही रक्कम घेण्यात आली नाही पूर्णपणे ही शस्त्रक्रिया मोफत करण्यात आली असून रुग्णाच्या आजोबा यांनी कापडणीस सर व आत्मा मलिक हॉस्पिटल स्टाफ व प्रशासनाचा आभार मानले आहे त्याचप्रमाणे डॉक्टर सतीश कापडणीस सर(pedatric surgeo nashik) हे प्रत्येक महिन्याच्या पहिल्याआणि तिसऱ्या बुधवारी आत्मा मालिक हॉस्पिटल मध्ये शस्त्रक्रिया व तपासणीसाठी उपलब्ध असतील





