ब्रेकिंग

एम आय डी सीसाठी पाठपुरावा केल्याबद्दल विवेकभैय्या कोल्हे यांचे सर्व स्तरातून कौतुक नागरिकांच्या वतीने कोल्हे यांचा सत्कार

एम आय डी सीसाठी पाठपुरावा केल्याबद्दल विवेकभैय्या कोल्हे यांचे सर्व स्तरातून कौतुक नागरिकांच्या वतीने कोल्हे यांचा सत्कार
कोपरगाव शिर्डी एम आय डी सी होण्याचा मार्ग मोकळा झाला असून शेती महामंडळाची जमीन देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत झाला असून बेरोजगारीला मोडीत काढण्यासाठी मोठी मदत होणार आहे यामुळे सातत्याने संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने गत पाच वर्षापासून पाठपुरावा केल्याबद्दल युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांचा सत्कार करण्यात आला आहे.व्यापारी,शेतकरी,उद्योजक,वकील,युवक यासह सर्व स्तरातून कौतुक होत आहे.बेरोजगारी मोडीत काढण्यासाठी विवेकभैय्या कोल्हे यांचे सातत्याने प्रयत्न सुरू होते.संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने सोनेवाडी चांदेकसारे,सावळीविहीर,संवत्सर,वारी  येथील शेती महामंडळाची जमीन मिळून त्यावर एम आय डी सी झाल्यास युवकांना मोठा रोजगार उपलब्ध होईल यासाठी २०१९ साली तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उद्योगमंत्री सुभाष देसाई,महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील,वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे मा.आ.सौ.स्नेहलताताई कोल्हे यांच्या वतीने पाठपुरावा केला त्याचे फलित होऊन विवेकभैय्या कोल्हे यांच्या सततच्या लढ्याला यश आले आहे.
जाहिरात

सर्व प्रकारे अनुकूल असणारा कोपरगाव तालुका आणि राहता तालुक्यातील शेती महामंडळाची जमिनीवर ही प्रस्तावित एम आय डी सी हजारो युवकांचे हात बळकट करणार असल्याने संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने स्वाक्षरी मोहीम राबवत सुरू केलेला हा लढा पूर्णत्वास गेला असून बाजारपेठ फुलण्यास मोठी मदत या निमित्ताने होणार आहे.शेती,रोजगार,युवा सशक्तीकरण सुनियोजित होऊन कोपरगाव राज्याचे एक महत्वाचे केंद्र बनणार आहे यासाठी विवेकभैय्या कोल्हे यांचे सत्कार करून अभिनंदन केले जात आहे.
यावेळी प्रसिद्ध व्यापारी नारायणशेठ अग्रवाल,कारखाना संचालक बापूसाहेब बारहाते,माजी सभापती संभाजी रक्ताटे,देवयानी बँकेचे व्हा.चेअरमन रेवजी आव्हाड, ॲड.अशोक टुपके,गोरख आहेर,पी.सभारांजक आदींसह मान्यवरांनी कोल्हे यांचा सत्कार केला.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे