ब्रेकिंग

किती काळ राहणार को.न.पा शाळा अधुनिकरण प्रश्न प्रलंबित:- सामाजिक कार्यकर्ते किशोर चोरगे

किती काळ राहणार को.न.पा शाळा अधुनिकरण प्रश्न प्रलंबित:- सामाजिक कार्यकर्ते किशोर चोरगे

को.न.पा नगरपालिका शाळा अधुनिकरण करण्यात यावी हा मुद्दा जयहिंद विचार मंच कोपरगाव यांनी आंदोलन करून अग्रगण्य आणल्या पासुन महाराष्ट्र विधानसभेचे २०१७ ते २०२३ पर्यंत २१ अधिवेशन झाली आणि कोपरगांव विधानसभेला दोन विधानसभा लोकप्रतिनिधींचा कार्यकाळ लाभला.पण सामन्य माणसाच्या जिव्हाळ्याचा प्रश्न कोपरगाव नगरपालिका शाळा अधुनिकरणाचा विषय आज हि प्रलंबितच आहे ?असे मत सामाजिक कार्यकर्ते किशोर चोरगे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे पुढे प्रसिद्ध पत्रकात म्हटले आहे की कोणत्याही सरकारच्या धोरणामध्ये समान शिक्षण सर्व शिक्षा हा अग्रबिंदु ही असतोच जास्तीत जास्त सामन्य जनतेला शिक्षण मिळणे म्हणजे व्यवस्थेला प्रगती पथावर नेण्याचा राजमार्ग आहे पण अनेक शासकिय शिक्षण संस्थेच्या अधोगतीचा प्रश्न सातत्याने पुढं येत आहे शहरी भागातील नगरपालिका शाळा आणि ग्रामीण मधील जिल्हा परिषद शाळ्यांची पटसंख्या शासकिय कुचकामी धोरणाने कमी होत आहे व शासन पटसंख्या कमी झाली ती पटसंख्या वाढेल कशी यावर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा शासनाने जालीम उपाय वापरत शासकिय शाळाच बंद केल्या जात आहे

जाहिरात

कोपरगावातील समाज व्यवस्थेत अनेक वंचित स्वरूपाचे घटक समुह आहे असे घटक समाजाचा भाग तर आहे परंतु कमी शिक्षणामुळे समाजाच्या मुख्य प्रवाहात नाही त्यांना प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण हे माध्यम मैलाचा दगड ठरतो आज या घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाने उपाय योजना करत शासकिय शाळांच पुनर्वसन होण महत्वाचं होतं
पण या स्थानिक भागातील शासकिय शाळा पुनर्निर्माण करण्यासाठी विधानसभा लोकप्रतिनिधींनी विधान सभेत लक्षवेधी मांडत निधी मिळवला पाहिजे होता असं जर झालं तर कोपरगाव शहरातील अनेक स्लम भागातील मुल मुली समाजाच्या मुख्य प्रवाहात येऊन त्यांच्या जिवनाला स्थैर्य शिक्षणातुन प्राप्त करता आलं असत पण दुर्दैवाने कोपरगांव नगरपालिका शाळेत अस काही घडलेच नाही शहराच्या वतीने पाठींबा व को.न.पा शाळेला निधी येण्याकरीता नगरपालिकाने सर्वसाधारण सभेत ठराव मंजूर केला पण संबंधित विभागाकडून त्या ठरावाला महत्व न देता केराची टोपली दाखवण्यात आली या आंदोलनाच्या कार्यकाळात महाराष्ट्र विधानसभेचे २१ अधिवेशन पार पडली आणि दोन लोकप्रतिनिधी जनतेच्या सेवेकरीता जनतेने निवडुन दिले तरी कोपरगाव नगरपालिका शाळा अधुनिकरण प्रश्न आज हि प्रलंबित आहे अशी शोकांतिका हि कधीच संपणार असं वाटतं नाही याप्रकारची भावनिक खंत प्रसिद्धी पत्रका अंती कोपरगांवच्या शैक्षणिक प्रश्नावर आवाज उठवणारे सामाजिक कार्यकर्ते किशोर चोरगे यांनी व्यक्त केली आहे

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे