कोपरगाव तालुका बॉडी बिल्डिंग असोसिएशनच्या अध्यक्षपदी शरद खरात यांची निवड


कोपरगाव तालुका बॉडी बिल्डिंग असोसिएशनच्या अध्यक्षपदी शरद खरात यांची निवड
संपादक:-रवींद्र जगताप
कोपरगाव तालुक्यात बॉडी बिल्डिंग स्पर्धा दरवर्षी संपन्न होत असतात.तरुणांना योग्य मार्गदर्शन मिळावे तसेच त्यांच्या उज्वल भविष्यासाठी संघटना महत्वाचा घटक मानला जात असतो.बॉडी बिल्डिंग असोसिएशनच्या मार्गदर्शना मुळे अनेक तरूणांना आपले करिअर घडवता आले आहे.नुकतीच दि.17/12/23 रविवार रोजी कोपरगाव तालुका बॉडी बिल्डिंग असोसिएशनची बैठक घेण्यात आली.या बैठकीत सर्वानू मते तालुका अध्यक्षपदी शरद खरात यांची एकमताने निवड करण्यात आली. त्याच बरोबर इतरही महत्वाच्या पदाची कार्यकरणी जाहिर करण्यात आली असुन यामध्ये. ग्रामीण अध्यक्ष:-बाळासाहेब घेर,तालुका उपाध्यक्षपदी ऋषिकेश आढाव,तालुका उपाध्यक्षपदी डॉक्टर. दीपक पगारे,ग्रामीण उपाध्यक्षपदी कौस्तुभ वाघे,कार्याध्यक्षपदी:-प्रमोद सोनवणे,सचिव पदी:-अभय हलवाई,सह सचिव:-आतिश बोरुडे,सदस्य:-चंद्रकांत जगदाळे सदस्य:-रवींद्र साळुंके,सदस्य:-सागर भड यांची ही निवड करण्यात आली व कमिटी तयार करून ठराव मंजूर करण्यात आला. निवड झलेल्या पदअधिकारी यांचे कमिटीच्या वतीने सत्कार करून अभिनंदन करण्यात आले. व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.तसेच कोपरगाव या ठिकाणी लवकरच कोपरगाव तालुका श्री, उत्तर महाराष्ट्र मास्टर श्री व उत्तर महाराष्ट्र क्लासिक श्री, या शरीर सौष्ठव स्पर्धा घेण्यात येणार आहे. तसेच लवकरच स्पर्धेची तारीख व ठिकाण डिक्लेअर करण्यात येईल.तसेच ही बैठक यशस्वी करण्यासाठी अमीन सय्यद, प्रतीक पाटील (नगर जिल्हा खजिनदार व महाराष्ट्र लेव्हल जज), विदित जोशी, विजय घोरपडे यांनी विशेष परिश्रम घेतले.






