ब्रेकिंग

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कामगार पतपेढीच्या अध्यक्षपदी साईनाथ तिपायले तर उपाध्यक्षपदी केशव बटवाल यांची बिनविरोध निवड.

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कामगार पतपेढीच्या अध्यक्षपदी साईनाथ तिपायले तर उपाध्यक्षपदी केशव बटवाल यांची बिनविरोध निवड.

संपादक:- रवींद्र जगताप
 कोपरगांव:-  तालुक्यातील शिंगणापुर येथील संजीवनी उद्योग समुहाचे संस्थापक माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या प्रेरणेतुन व बिपीनदादा कोल्हे, माजी आमदार सौ. स्नेहलता कोल्हे यांच्या नेतृत्वाखालील तसेच जिल्हा सहकारी बँकेचे संचालक, युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कामगार पतपेढीच्या अध्यक्षपदी साईनाथ पंढरीनाथ तिपायले तर उपाध्यक्षपदी केशव गोविंद बटवाल यांची नुकतीच बिनविरोध निवड झाली आहे. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कोपरगांव कार्यालयाचे के. आर. वाळके होते. कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार, साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे यांच्या हस्ते नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्षांचा सत्कार करण्यांत आला.
जाहिरात
अध्यक्षपदासाठी श्री. साईनाथ तिपायले यांच्या नावाची सुचना संचालक विलास कहांडळ यांनी केली तर त्यास संचालक उत्तम शेळके यांनी अनुमोदन दिले तर उपाध्यक्षपदासाठी केशव बटवाल यांच्या नावाची सुचना  संचालक आण्णासाहेब पगारे यांनी केली तर त्यास संचालक सुदाम उगलमुगले यांनी अनुमोदन दिले. माजी अध्यक्ष देवराम देवकर व उपाध्यक्ष सुदाम उगलमुगले यांचाही यावेळी सत्कार करण्यांत आला. सत्कारास उत्तर देतांना नवनिर्वाचित अध्यक्ष साईनाथ तिपायले व उपाध्यक्ष केशव बटवाल म्हणाले की, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी कारखान्यांचे युवा अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे यांच्या मार्गदर्शनांखाली काम करून सभासद, कामगारांच्या अडी अडचणी सोडविण्यांस प्राधान्य देउ.या निवडीबददल माजी आमदार स्नेहलता कोल्हे, साखर कारखान्याचे उपाध्यक्ष मनेष गाडे, सर्व संचालक, व्यवस्थापकीय व्यवस्थापक प्रकाश डुंबरे, कामगार नेते मनोहर शिंदे, संजीवनी उद्योग समुहातील विविध संस्थांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक, पदाधिकारी, कारखान्याचे सर्व खाते प्रमुख, उपखाते प्रमुख, भाजपचे तालुकाध्यक्ष कैलास राहणे आदिंनी अभिनंदन केले. ही निवड बिनविरोध पार पाडण्यासाठी स्विय्य सहाय्यक रंगनाथ लोंढे, पतपेढीचे संचालक सर्वश्री. सुरेश मगर, सुभाष होन यांनी विशेष सहकार्य केले. कार्यकमाचे सुत्रसंचलन व आभार व्यवस्थापक राजेंद्र सोनवणे यांनी केले.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे