ब्रेकिंग

दिव्यांग सेल जागतिक मानव अधिकार सुरक्षा फेडरेशनच्या जिल्हाध्यक्षपदी मुकुंदमामा काळे यांची नियुक्ती

दिव्यांग सेल जागतिक मानव अधिकार सुरक्षा फेडरेशनच्या जिल्हाध्यक्षपदी मुकुंदमामा काळे यांची नियुक्ती

संपादक:- रवींद्र जगताप

कोपरगाव प्रतिनिधी -सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक क्षेत्रात कायम अग्रेसर म्हणून अहमदनगर जिल्ह्यात ओळखले जाणारे मुकुंदमामा काळे यांच्या कार्याची दखल घेत राष्ट्रीयअध्यक्ष राजेंद्र आहेर यांनी दिल्ली येथील दिव्यांग सेल जागतिक मानव अधिकार सुरक्षा फेडरेशनच्या अहमदनगर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्यावर सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


आजच्या धकाधकीच्या काळात आज प्रत्येक व्यक्ती संकटातून सामोरे जातो त्यात काही संघर्ष करून यश मिळवतो त्याच पद्धतीचे कार्य नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष मुकुंदमामा काळे यांचे आहे. यांच्या पुढे देखील अनेक संकटे आली परंतु त्यात मुकुंदमामा काळे यांनी मागे पाऊल न टाकता पुढे पाऊल टाकत आलेल्या संकटांचा सामना करून यश मिळवलं आहे. म्हणून त्यांना संघर्षातुन यश मिळवणारा सामाजिक कार्यकर्ता म्हणून ओळखले जाते. आज याच कार्याची पावती म्हणून दिल्ली येथील दिव्यांग सेल जागतिक मानव अधिकार सुरक्षा फेडरेशनच्या अहमदनगर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करून जिल्ह्याची जवाबदारी देण्यात आली.

दिव्यांग म्हणटले की त्या व्यक्तीला   बाजूला केले जायचं मग तिथं शासन असो किंवा कोणीही असो
दिव्यांगाना आधार नव्हता आधाराची गरज होती. मुकुंदमामा काळे माझ्या संपर्कात आले तेव्हा पासून ते आज पर्यंत माझ्या मार्गदर्शन खाली दिव्यांग मित्र परिवाराचे बरेच प्रश्न सोडविण्यात त्यांना माझी मदत झाली. आज त्या व्यक्तीने आयुष्यातील कोणत्याही गोष्टीची कमतरता जाणवु दिली नाही. आज त्यांची निवड झाली आज जिल्ह्यातील सर्व दिव्यांग बांधवांसाठी आनंदाची बाब असून मुकुंदमामा यांच्या माध्यमातून अनेकांचे प्रश्न मार्गी लागणार यात शंकाच नाही.

श्री.बापुराव काणे साहेब ( राज्य अध्यक्ष, प्रहार दिव्यांग क्रांती

श्री. मुकुंदमामा काळे यांच्या नियुक्ती बरोबर श्री. मोहन लक्ष्मण निकम यांची जागतिक मानव अधिकार सुरक्षा फेडरेशनच्या कोपरगाव तालुका कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नवनिर्वाचित पदाधिकारी यांचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र आहेर, राष्ट्रीय सचिव वाल्मीक महाराज जाधव, महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर सोनवणे, राज्य अध्यक्ष यशवंत शिरसाठ व अहमदनगर जिल्हा कार्याध्यक्ष रावसाहेब जगताप यांनी शुभेच्छा देवून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे