ब्रेकिंग

श्रीलंकेहून अयोध्येला निघाल्या प्रभू श्रीरामांच्या पादुका…27 तारखेला येणार कोपरगावात…

श्रीलंकेहून अयोध्येला निघाल्या प्रभू श्रीरामांच्या पादुका…27 तारखेला येणार कोपरगावात...

सकल हिंदू समाजाची नियोजन बैठक  कोपरगावात संपन्न

कोपरगाव प्रतिनिधी :-27 डिसेंबर बुधवारी सकाळी 9 वाजता श्री सुरेशजी चव्हाणके यांच्या पुढाकारातून श्रीलंकेहुन अयोध्येला निघालेल्या प्रभू श्रीरामांच्या पादुकांचे आगमन कोपरगांव शहरात होत आहे,त्यानिमित  सकल हिंदु समाजाची बैठक कोपरगांव शहरात नुकतीच संपन्न झाली. असंख्य राम भक्तांच्या उपस्थितित झालेल्या  या बैठकीत या पादुका यात्रेबद्दल सविस्तर माहिती सकल हिंदु समाजाच्या वतीने देण्यात आली.  त्यात प्रामुख्याने दि 27-12-2023 ,रोजी सकाळी 9 वा कोटमगाव येथून या पादुका यात्रेचे  येवला नाका कोपरगांव येथून शहरात प्रवेश होईल व विघ्नेश्वर मंदिर येथे आगमन होईल.विघ्नेश्वर मंदिर येथून  या पादुका पालखीने शहरातील मुख्य  रस्त्याने मिरवणुकीद्वारे गांधीनगर येथील रामभक्त हनुमान मंदिरात पोहचतील तेथे धार्मिक विधी पार पडल्यानंतर मिरवाणुकीद्वारेच या पादुका शहरातील सावरकर चौक येथे पोहचतील.सावरकर चौक येथे जे रामभक्त कारसेवेसाठी गेले होते त्यांचा सत्कार होईल व तदनंतर हिंदु धर्म योद्धा सुरेशजी   चव्हाणके यांचे प्रबोधन होऊन सदरिल पादुका यात्रेचे अयोध्याकड़े प्रस्थान होईल,अशी माहिती सकल हिंदू समाज कोपरगांव कडून देण्यात आली
मिरवाणुक मार्ग
विघ्नेश्वर मंदिर-गुरुद्वारा रोड-टिळकनगर- गांधीनगर ( हनुमान मंदिर)-कन्या विद्या मंदिर-  क्षीरसागर हॉस्पिटल- महावीर पथ-छ.शिवाजी महाराज स्मारक-गांधी चौक-सावरकर चौक (समारोप )

सत्य एक्सप्रॆस न्युजच्या व्हाँटसाँप ग्रुपवर सहभागी होण्यासाठी खालिल लिंक दाबा

https://chat.whatsapp.com/CTDmmJtLO0G0xxPjGv1gcS

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे