धार्मिक

जेऊर पाटोदा ग्रामस्थांच्या वतीने  २२ जानेवारी रोजी प्रभु  श्रीराम मुर्ती प्रतिस्थापना निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन

जेऊर पाटोदा ग्रामस्थांच्या वतीने  २२ जानेवारी रोजी प्रभु  श्रीराम मुर्ती प्रतिस्थापना निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन

संपादक :- रवींद्र जगताप

22 जानेवारी 2024 रोजी  अयोध्या मध्ये प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणार असून देशभरामध्ये आनंदाचे वातावरण असून या निमित्ताने जेऊर पाटोदा या ठिकाणी जेऊर पाटोदा ग्रामस्थांच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे धारणगाव रोड आनंद नगर महादेव मंदिर जवळ जेऊर पाटोदा कोपरगांव येथे सकाळी ९ वाजता साधु संताच्या हस्ते पालखी पुजन त्या नंतर पालखी मिरवणूकीस प्रस्थान होवुन दुपारी १२:३० वाजता सामुदायिक महाआरती केली जाणार आहे.त्यानंतर १ वाजता महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे तरी सर्व भाविक भक्तांनी नागरिकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन कार्यक्रमाच्या आयोजकांनी केली अशोकराव नाईक, भाऊसाहेब नाईक, रवीकाका बोरावके, राजेंद्र नाईक, अमोल फटांगरे दादा, प्रविण कुडके, बाळासाहेब दवंगे, ज्ञानेश्वर जाधव, प्रितेश केकाण, भरत आगळे, रमेश टिक्कल,महेंद्र उगले, दर्शन जाधव, सतीश औटी, रविंद्र निकम, आदी ग्रामस्थ जेऊर पाटोदा कोपरगांव यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केलेले आहे

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे