सामाजिक
कै.साहेबराव जगताप यांचे निधन
निधन वार्ता:
कै.साहेबराव जगताप यांचे निधन
तालुक्यातील कान्हेगाव येथील ह.भ. प. साहेबराव चांगदेव जगताप (वय ९२)यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे.त्यांचे पाठीमागे तीन मुले एक मुलगी ,सुना,नातवंडे असा मोठा परिवार आहे.ते सदगुरू गंगागिरी महाराज व नारायण गिरी महाराज यांचे निस्सीम भक्त होते.त्यांनी संपूर्ण आयुष्य परमार्थात घालवले.त्यांच्या जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.ते पत्रकार जनार्दन जगताप (सर) यांचे वडील होत.





