धार्मिक
जय बजरंग मित्र परिवार टिळकनगर येथे श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त फळे वाटप
जय बजरंग मित्र परिवार टिळकनगर येथे श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त फळे वाटप
-संपादक रवींद्र जगताप
कोपरगाव : अयोध्येमध्ये प्रभू श्रीराम मंदिराचे उद्घाटन व रामलल्ला मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा सोमवारी (२२ जानेवारी) मोठ्या उत्साहात पार पडला. या ऐतिहासिक सोहळ्याच्या निमित्ताने देशभरात आनंद उत्सव साजरा केला जात आहे प्रत्येक गावोगावी भगवे ध्वज त्याचबरोबर घरासमोर रांगोळी काढून नागरिकांनी प्रभू श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात साजरा केला आहे श्रीराम मंदिर मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा देशभरात दिवाळी सणाप्रमाणे साजरा केला जात आहे कोपरगाव येथील जय बजरंग मित्र परिवार टिळकनगर येथे श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्ताने फळे वाटप करण्यात आले आहे.याप्रसंगी टिळकनगर येथील भाविक तसेच व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या ठिकाणी सर्व व्यापारी बांधवांनी एकत्रित ऐवुन हा संपन्न केला





