डॉ. बाबासाहेब आंबेडकर व माता रमाई यांच्या ११३व्या मंगल परिणय दीना निमित्त वंचित बहुजन युवा आघाडी तर्फे महिला संकल्प मेळावा व समाजभूषण सोहळा संपन्न
डॉ. बाबासाहेब आंबेडकर व माता रमाई यांच्या ११३व्या मंगल परिणय दीना निमित्त वंचित बहुजन युवा आघाडी तर्फे महिला संकल्प मेळावा व समाजभूषण सोहळा संपन्न
राहता तालुक्यातील चितळी रेल्वे स्टेशन वरील बुद्ध विहार समोर डॉक्टर महामानव बाबासाहेब आंबेडकर व माता रमाई यांच्या 113 व्या मंगल परिणय दिनानिमित्ताने वंचित बहुजन युवा आघाडी यांच्यातर्फे महिला संकल्प मेळावा व समाजभूषण पुरस्कार सोहळा घेण्यात आला. सर्वप्रथम कार्य आयोजक यांच्याकडून या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र राज्य प्रवक्त्या उत्कर्षा ताई रुपवते यांना देण्यात आले. अध्यक्षस्थान निवडी नंतर सर्व महापुरुषांना पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. भीम शाहीर यांच्याकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापुरुषांवर भीम गीते सादर करण्यात आली. त्यानंतर आलेल्या पाहुण्यांचे सत्कार समारंभ व त्यांचे भाषणे घेण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजक वंचित बहुजन आघाडी युवा जिल्हाध्यक्ष प्रवीण भाऊ अल्हाट, युवा जिल्हा उपाध्यक्ष बबलू भाऊ पगारे व त्यांना अनमोल सहकार्य भारतीय बौद्ध महासभा यांनी केले. आरपीआयचे जिल्हाध्यक्ष पप्पू भाऊ बनसोडे, आरपीआय जिल्हा उपाध्यक्ष बंटी भाऊ पगारे , वंचित बहुजन आघाडी श्रीरामपूर तालुका अध्यक्ष चरण दादा त्रिभुवन, बौद्ध महासभेचे कार्यकर्ते रमेश निकम सर, बहुजन भीम पँथर सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष इब्राहिम उर्फ मुन्नाभाई शेख, वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष अजिज भाई बोहरा, यांना समाज भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.





