आरोग्य व शिक्षण

आंतरराष्ट्रीय योगदिनी रामेश्वर विद्यालयात शालेय विद्यार्थ्यांना योगाचे धडे

आंतरराष्ट्रीय योगदिनी रामेश्वर विद्यालयात शालेय विद्यार्थ्यांना योगाचे धडे

योग साधना करत स्वतःचा शारीरिक व मानसिक विकास करून विद्यार्थ्यांनी निरोगी आयुष्य जगावे – अशोक कानडे

कोपरगाव (प्रतिनिधी)- तालुक्यातील वारी येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस २१ जून रोजी रयत शिक्षण संस्थेचे श्री रामेश्वर विद्यालय आणि भारतीय योग संस्थान दिल्ली संचलित वारी केंद्रांचे वतीने योगाभ्यास करत योग दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी योगासने प्राणायाम ध्यान करत विद्यार्थी शिक्षक व पालक यांनी बारावा योग दिवस अत्यंत उत्साहात साजरा केला.याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अशोक कानडे यांनी योग दिनाचे महत्व सांगत दिवसाची रोजची सुरुवात योगाभ्यासाने करून शारीरिक व मानसिक विकास करावा व निरोगी आयुष्य जगावे असा मोलाचा सल्ला दिला

यावेळी विद्यालयाचे विज्ञान शिक्षक श्री कैलास शेळके सर यांनी प्रास्ताविक व स्वागत केले यावेळी योग साधकांचा शाल,श्रीफळ, गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला वारी येथील माजी पंचायत समिती सदस्य तथा भारतीय योग संस्थान संचलित वारी केंद्राचे योगा शिक्षक अशोकराव कानडे यांनी उपस्थित सर्वांचा योगाभ्यास करून घेतला.

भारतीय योग संस्थानच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून वारी येथे निशुल्क सेवा केंद्र सुरु असुन संभाजीनगरचे प्रसिद्ध योगा एक्सपर्ट डॉ उत्तम काळवणे सर यांचे मार्गदर्शनाखाली योगाभ्यास करण्याचा लाभ यापुढे देखील विध्यार्थ्यांनी व ग्रामस्थांनी घेण्याचे अवाहान श्री अशोक कानडे यांनी करुन योगासन, प्राणायाम, ध्यान या संदर्भात योग साधनेचे आजच्या जीवनशैली करीता असणारे महत्व त्यांनी पटवून दिले यावेळी शाळेचे मुख्याध्यापक शरीफ शेख सर, कैलास शेळके सर यांचे सह कु ईश्वरी कानडे, कु ईशा सुनिल महाले यांनी योगासनांची विविध प्रात्यक्षिके सादर केली सुक्ष्म व्यायाम पद्मासन भुजंगासन शलभासन त्रिकोणासन ताडासन,सूर्यनमस्कार ,शवासन,नावासन,अनुलोम विलोम ओंकार , प्राणायाम यासह योगा संदर्भात शास्त्रीय माहिती देवून त्याचे निरोगी आणि उत्तम आरोग्यासाठी होणारे फायदे सांगितले.याप्रसंगी रामेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक शरीफ शेख सर ,विज्ञान शिक्षक कैलास शेळके सर यांनी विविध प्रात्यक्षिका द्वारे योगासनांची माहिती दिली यावेळी माजी विद्यार्थी तथा शिक्षण प्रेमी पालक श्री मच्छिंद्र गांगड, जाधव सर श्री रविंद्र रासकर सर, श्री सिताराम झुराळे,श्री तुकाराम जेठे सर, श्रीमती कर्डेल मॅडम,कर्पे मॅडम,शाळेचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी व विद्यार्थीनी मोठया संख्येने उपस्थित होते. आंतरराष्ट्रीय योग दिनी योग शिक्षकांकडून मिळालेल्या शास्त्रोक्त माहिती आणि प्रात्यक्षिकाने विद्यार्थी शिक्षक व वारी ग्रामस्थ आदी उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे