कोपरगाव शहर पोलीसांनी डिझेल चोर केले 24 तासाचे आत अटक.
कोपरगाव शहर पोलीसांनी डिझेल चोर केले 24 तासाचे आत अटक.
संपादक :- रविंद्र जगताप
दिनांक २९/०३/२०२३ रोजी फिर्यादी नामे रामकुमार शिवप्रसाद पटेल वय २९ वर्ष, गाव बनकरा ता. शिरा, जि. कौसांबी, राज्य उत्तर प्रदेश यांनी पोलीस स्टेशनला येवुन फिर्यादी दिली की, दिनांक २९/०३/२०२३ रोजी पहाटे ०५.०० वा चे च्या सुमारास जेउर कुंभारी शिवार ता कोपरगाव येथे येथे समृध्दी महामार्गाचे टोलनाक्याजवळ अलीकडे रस्त्याचे कडेला उभा केलेला कंटेनर मधील ११,१६०/- रु कि ये १२० लिटर डिझेल हे कोणीतरी अज्ञात आरोपीने चोरून नेले होते. त्यावरुन कोपरगाव शहर पोलीस स्टेशन गुरजि नंबर १४८/२०२३ भादवि कलम ३७९,३४ प्रमाणे अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.


सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक, रामराव ढिकले यांना गुप्त बातमीदारामार्फत माहीती मिळाली की. समृध्दी महामार्गाजवळ, जेउर कुंभारी शिवारात डिझेल चोरी करणारे काही संशयीत इसम आहेत. अशी माहीती मिळाल्यानं पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांनी पोलिस उपनिरिक्षक भरत दाते, पोहेकी / 391 आर. पी. पुंड, पोलिस हेड कॉस्टेबल/ 2550 के. ए. जाधव, पोकों/ 2622 संभाजी शिंदे, पोकी/महेश फड, पो कौ/ 1910 वाय बी सुंबे, पोकों/ 2538 जी. पी. थोरात पो को 2611 राम खारतोडे, पो को/2563 गणेश काकडे अशांना सदर ठिकाणी जावून संशयीत इसमांना ताब्यात घेणे बाबत आदेशीत करून सूचना दिल्याने वरील नमुद अधिकारी व अंमलदार यांनी जेडर कुंभारी शिवारात, समध्दी महामार्गाचे ठिकाणी जावुन त्या ठिकाणवरुन चार संशयीत इसमांना ताब्यात घेतले त्यांचे नाव विचारले असता त्यांनी त्याचे नाव 1) रविराज किशोर देसले, वय 26 वर्षे, रा. निमगवाडी, ता. राहाता 2) विक्की मच्छिद्र गायकवाड, वय 27 वर्ष, निमगांववाडी ता. राहाता, 3) तान्हाजी किसन वायदंडे, वय 60 वर्षे, रा. गणेशनगर ता. राहाता 4) साहेल अली इम्तीयाज सय्यद वय 35 वर्षे, रा. जाज माउ, शितला “बाजार, मॉर्डन टेंडरी थे बाजुस ता.जि.कानपुर हल्ली रा. शिर्डी ता. राहाता असे असल्याचे सांगितले. त्यांचेकडेस गुन्हयाचे अनुषंगाने विचारपुस केली असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली परंतु त्यांचेकडे कसून चौकशी केली असता, त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली दिनांक 29.03.2023 रोजी आम्ही सर्वानीच समृध्दी महामार्गावर उभ्या असलेल्या कंटेनर मधील डिझेल चोरी केलेली आहे. व चोरलेले डिझेल रमेश वायदंडे यांचेकडील चारचाकी मधुन रामपुरवाडी रोड शिवारातील पत्राचे हॉटेल मध्ये लपवुन ठेवलेले आहे. असे सांगितले. त्यांनी सांगितलेल्या ठिकाणी जावून खात्री केली असता, राहाता तालुक्यातील रामपुरवाडी शिवारातील एका हॉटेल मधुन 9,765/- रु किमतीचे 105 लिटर डिझेल ड्रम मध्ये भर, डिझेल भरण्यासाठी असलेले तीन प्लास्टीकचे ड्रम, डिझेल काढण्यासाठी वापरायचे तीन प्लास्टीकचे पाईप असा एकूण 9.765/- रु कि चा मुद्देमाल मिळून आला आहे. नमुद चार आरोपींना दिनांक 30/03/2023 रोजी 01.49 वा सदर गुन्हयात अटक केली असून त्यांचा साथीदार आरोपी क्र.05 रमेश तानाजी वायदंडे रा. गणेशनगर ता राहाता हा फरार झालेला असुन त्याचा शोध सुरु आहे.आरोपी नामे) रविराज किशोर देसले, वय 26 वर्षे, रा. निमगांववाडी, ता. राहाता 2) विक्की मछिद्र 2) गायकवाड, वय 27 वर्षे, निमगांववाडी ता. राहाता, 3) तान्हाजी किसन वायदंडे, वय 60 वर्षे, रा. गणेशनगर ता. राहाता 4) सोहेल अली इम्तीयाज सय्यद वय 35 वर्षे, रा. जाज माड, शितला बाजार, मॉर्डन टेंडरी चे बाजुस ता. जि. कानपुर हल्ली रा. शिडी ता. राहाता 5) रमेश तानाजी वायदंडे रा. गणेशनगर ता राहाता यांनी दिनांक 29/03/2023 रोजी जेवर कुंभारी शिवारातुन समृध्दी महामार्गाचे ठिकाणवरुन कंटेनर क्र.MH 04 FU 0351 मधुन चोरेलेले 9,765/- रु किमतीचे 105 लिटर डिझेल, तीन ड्रम, तीन पाईप असा मुद्देमाल हस्तगत केला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक, रामराव ढिकले यांचे मार्गदर्शनाखाली पोहेकी २५५० के.ए. जाधव हे करीत आहेत.> आरोपी क्र. ४ सोहेल अली इम्तीयाज सय्यद याचेवर खालील प्रमाणे डिझेल चोरीचे व इतर गुन्हे दाखल आहेत.
१) घारगाव पोलीस स्टेशन गुरजि न. 396/2022 भादवि कलम 379.34 प्रमाणे
(२) घारगाव पोलीस स्टेशन गुरजि न. 403/2022 भादवि कलम 379,34 प्रमाणे
३) धारगाव पोलीस स्टेशन गुरजि न. 404/2022 भादवि कलम 307,353,322,434 प्रमाणे
४) घारगाव पोलीस स्टेशन गुरजि नं. 405/2022 भादवि कलम 379,34 प्रमाणे.
> आरोपी क्र. 3 तान्हाजी किसन वायदंडे, रा. गणेशनगर ता. राहाता याचेवर खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहे.
1) शिर्डी पोस्टे गुरजि नं.48/2002 भादवि क 379 प्रमाणे,
आरोपी क्र.05 रमेश तानाजी वायदंडे रा. गणेशनगर ता राहाता याचेवर खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत. १) शिर्डी पोलीस स्टेशन ५६९/२०१९ भा.द.वि. कलम ३०२, १२० (ब) प्रमाणे आरोपी क्र.०५ याचेवर दाखल आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक श्री. राकेश ओला सो. अहमदनगर, मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती स्वाती भोर मॅडम, श्रीरामपुर विभाग, मा. उपविभागीय पोलीस अधीकारी श्री. संजय सातव सो. शिडी विभाग शिडी यांचे मार्गदर्शनाखाली, पो.नि. रामराव ढिकले, पोउपनि भरत दाते, पोहेकॉ 391 आर.पी.पुंड, पोहेकॉ / 2550 के. ए. जाधव, पोकों/ 2622 संभाजी शिंदे, पोकों 2611 राम खारतोडे, पो कॉ / 2563 गणेश काकडे, पोकॉ/2538 जी.पी. थोरात, पोकों/ 1910 वाय. के. सुंबे, पोहेकॉ महेश फड यांनी केलेली आहे.