“राष्ट्रीय समाज पक्षाच्या शिर्डी लोकसभा उपाध्यक्ष पदी – शरद त्रिभुवन यांची निवड”
“राष्ट्रीय समाज पक्षाच्या शिर्डी लोकसभा उपाध्यक्ष पदी – शरद त्रिभुवन यांची निवड”
संपादक रवींद्र जगताप
राष्ट्रीय समाज पक्षाच्या शिर्डी लोकसभा मतदार संघाच्या उपाध्यक्ष पदी सामजिक कार्यकर्ते व लहूजी टायगर सेनेचे संस्थापक अध्यक्ष शरद त्रिभुवन यांची निवड करण्यात आली या बाबतची सविस्तर माहिती अशी की राष्ट्रीय समाज पक्षाच्या संभाजी नगर येथे झालेल्या अत्यंत महत्व पूर्ण बैठक राज्याचे प्रवक्ते प्रा भास्कर टेकाळे सर यांच्या उपस्थिती संपन्न झाली असून राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष बहुजन नायक महादेव जानकर साहेब यांच्या संघर्ष शिल विचारावर प्रभावित होऊन शरद त्रिभुवन यांनी लहूजी टायगर सेनेच्या वतीने आगामी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्षाला पाठींबा दिला असून शिर्डी लोकसभा मतदार संघात असलेला दांडगा जनसंपर्क लक्षात घेता शिर्डी लोकसभा मतदार संघाच्या उपाध्यक्ष पदी शरद त्रिभुवन यांची निवड करण्यात आली आपल्या निवडी नंतर शरद त्रिभुवन म्हणाले की बहुजन नायक महादेव जानकर साहेबांची सर्व समाज बांधवांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका ही समाजाला दिशा देणारी असून त्यांच्या आदेशाने राष्ट्रीय समाज पक्षाची भूमिका जनते पर्यंत पोहचविण्याचे काम व देतील ती जबाबदारी पार पाडणार आहे या वेळी राज्य कार्य कारणीचे सदस्य सैदू बाबा शेख उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष शरद बाचकर, रभाजी खेमनार, ॲड. नितिन पोळ,नानासाहेब जुंधारे, मुन्ना भाई शेख, जऱ्हाड मॅडम, सोपान तांबडे आदी उपस्थीत होते शरद त्रिभुवन यांच्या निवडीचे सर्वत्र स्वागत होत आहे





