मोफत शिक्षण द्या कोपरगाव.न.पा.शाळा आधुनिकीकरण करा मतदान मिळवा ( लोकसभा मतदानावर बहिष्कार )
मोफत शिक्षण द्या कोपरगाव.न.पा.शाळा आधुनिकीकरण करा मतदान मिळवा
( लोकसभा मतदानावर बहिष्कार )
जयहिंद विचार मंच संस्थापक अध्यक्ष व कोपरगाव नगरपालिका शाळा अधुनिकरण आंदोलनाचे जनक सामाजिक कार्यकर्ते किशोर चोरगे यांनी मागिल नऊ वर्षांत कोपरगाव नगरपालिका शाळा अधुनिकरण करण्या करता जनआंदोलन छेडले आहे शासनाला मोठ्या प्रमाणात पाठपुरावा केला पण प्रशासन उदासीन आहे कोणत्याच प्रकारे सकारात्मक प्रतिसाद दिला गेला नाही म्हणुन आम्ही येणाऱ्या लोकसभा मतदानावर बहिष्कार टाकत आहोत असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती दिली आहे प्रसिद्धी पत्रकात पुढे म्हंटले आहे कि शिक्षणाकरिता सामन्य माणसाला आज कर्ज काढावे लागत आहे हा बोजा सहनशीलतेच्या पलिकडचा आहे आणि व्यवस्थेची वरील कृती सामन्य जनतेचा खिसा गळका करणारी आहे


व्यवस्था हि शुध्दीवर येण्याकरीता जनतेकडून आता कठोर भुमिकेची गरज आहे सन १९६६-६७ ला कोठारी आयोगाने केंद्र सरकारला शिक्षणावरचा अहवाल दिला कि जी डी पी च्या ६’/. खर्च हा शिक्षणावर झाला पाहिजे पण या अहवालाची बजावणी झाली नाही राज्य सरकार २०१० पर्यंत स्वराज्य संस्थेला नगरोत्थान मध्ये शाळा अधुनिकरण करण्या करता निधी पुरवत होती पण तो निधी हि बंद झाला आज नगरपालिका शाळा ह्या काही बंद झाल्या आणि काही बंद होण्याच्या मार्गावर आहे कोपरगाव नगरपालिका शाळा पटसंख्या नाही म्हणुन कोपरगाव नगरपालिकाने को.न.पा शाळा २/८ बंद केल्या पटसंख्या वाढवण्यासाठी प्रयत्न होण्याची गरज होती पण तसं न होता शाळा बंद केल्या त्या शाळेची वर्ग पाडले व्यावसायिक गाळे बांधले काही शाळा इमारती भाडेतत्वावर चालवायला दिल्या हा सर्व सामन्य कुटुंबातील पिढीवर अन्याय आहे म्हणुन कोपरगाव शाळा अधुनिकरण करण्याकरता जयहिंद विचार मंच ने आंदोलन लावल पण प्रशासन सुस्त निद्रिस्त अवस्थेत आहे म्हणुन जो पर्यत कोपरगाव नगरपालिका शाळा अधुनिकरण करण्यात येत नाही तो पर्यंत मतदानावर सामुहिक बहिष्कार टाकण्यात येत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते किशोर चोरगे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहिर केलं आहे


