आचारसंहितेच्या नावाखाली अकारि पडितांचे आंदोलन चिरडून देणार नाही शेतकरी संघटना–जिल्हाध्यक्ष अनिल औताडे
आचारसंहितेच्या नावाखाली अकारि पडितांचे आंदोलन चिरडून देणार नाही शेतकरी संघटना–जिल्हाध्यक्ष अनिल औताडे
अकारि पडित संघर्ष कृती समितीने दिला प्रांत कार्यालयला कुलूप ठोकण्याचा इशारा.
श्रीरामपुर प्रतिनिधी :- प्रवीण साळवे
श्रीरामपूर शिरसगाव प्रतिनिधी.गेल्या चार दिवसापासून श्रीरामपूर प्रांत कचेरी मध्ये शेकडो अकारि पडित शेतकऱ्यांचा लढा सुरू आहे सदर आंदोलनात उपोषण करते बाळासाहेब आसने व अॅड सर्जेराव घोडे यांनी अन्नत्याग केलेला आहे. आज रोजी पाचवा दिवस उजळूनही सरकारने या आंदोलनाची कुठलीही दखल घेतली नाही त्यामुळे आंदोलकांनी सोमवार दिनांक १८/३/२०२४ रोजी दुपारी बारा वाजता प्रांत कार्यालयास कुलूप ठोकण्याचा इशारा दिला असून तशा आशयाचे लेखी पत्रही श्रीरामपूरचे तहसीलदार मिलिंद वाघ यांना दिले आहे. वास्तविक पाहता राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी १५/३/२०२४ रोजी दुपारी एक वाजेपर्यंत नगर दक्षिणचे दौरे केले परंतु पाच दिवस उलटूनही अकारि पडित संवेदनशील व प्रलंबित प्रश्नाबाबत सुरू असलेल्या आंदोलनास भेट दिलेली नाही यावरून शासनाच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे त्यामुळेच उपोषणकर्त शेकडो शेतकऱ्यांनी थेट तहसीलदारांनाच निवेदन दिले आहे


याबाबत शुक्रवारी दुपारी तहसीलदार मिलिंद वाघ श्रीरामपूर शहर चे पोलीस निरीक्षक श्री देशमुखसाहेब यांनी आंदोलन करते शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे ,तालुका अध्यक्ष युवराज जगताप ,शरद आसने, दादासाहेब आदिक, सोपान नाईक, साहेबराव चोरमल यांच्यासोबत उद्या १६/३/२०२४ रोजी तीन वाजेपासून लागू होत असलेल्या आचारसंहिते बाबत चर्चा केली. सदर चर्चेअंती तहसीलदार मिलिंद वाघ यांनी दि .१६/३/२०२४ रोजी ३ वाजे नंतर आंदोलनास प्रशासकीय इमारतीमध्ये बसता येणार नाही असे सूचित केले .यावरून उद्या तीन वाजे नंतर आम्ही आचारसंहिता भंग प्रकरणी आपणावर गुन्हे दाखल करण्यात येतील असे अप्रत्यक्ष सांगण्यात आले . यावर अकारिपडित संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने सांगितले की आमचे आंदोलन हे १२ तारखेपासून सुरू असून त्यास उद्या पाच दिवस होत आहे या पाच दिवसाच्या कालावधीमध्ये शासनाने उपोषणकर्त्या शेतकऱ्यांना भेट देऊन अकारि पडित प्रश्न लेखी देऊन आश्वासित करून विश्वसाहरता दर्शविणे गरजेचे होते. परंतु तसे न होता शासनाने आचारसंहितेच्या नावाखाली सदर आंदोलन दडपण्याचा अप्रत्यक्ष प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे. सदर बाब खपवून घेतली जाणार नाही शेतकऱ्यांचा लढा न्याय मिळेल पर्यंत लढू असा निर्धार अकारिपडित संघर्ष समितीने केला. यावेळी आंदोलनास सुरेश गलांडे विरेश गलांडे चंद्रकांत उंडे, बाळासाहेब पटारे भरत असणे, राजेंद्र पाऊलबुध्दे, विजय आदिक, अॅड विष्णूपंत ताके ,शरद पवार राजेंद्र आदिक, मालन झुरळे, सागर मुठे, विठ्ठलराव आसने, डॉ बबनराव आदिक, बाळासाहेब पगारे,सदाभाऊ उंडे, दिपक कुर्हाडे, वैभव आढाव आदींनी सहभाग नोंदवून पाठिंबा दिला तालुक्यातील प्रलंबित असलेल्या आकारिपडीत प्रश्न तालुक्यातील सर्वच सामाजिक राजकीय थोर मोठ्या नेत्यांनी सहभाग नोंदविला आहे .तरी शासनाने उद्या तीन वाजेच्या आत आंदोलनास संवेदनशील मार्गाने विचार करून आकारी पडीत प्रश्न सोडविण्यासाठी लेखी आश्वासित करावे असे आकारिपडीत संघर्ष समितीच्या वतीने आव्हान करण्यात येत आहे.


