जागरूक ग्राहक होणे काळाची गरज
जागतिक ग्राहक दिन, जागरूक ग्राहक होणे काळाची गरज
आजच्या या युगामध्ये ग्राहक हा महत्त्वाचा घटक आहे कुठलाही बाजारात जा, ग्राहका शिवाय मजा नाही ग्राहक हा राजा मानला जातो तर ग्राहक हा देवही मानला जातो परंतु ग्राहकांच्या अनेक अडचणी देखील आहेत अनेक ठिकाणी व्यापारी दुकानदार ग्राहकांना फसवत असतात छोट्या छोट्या गोष्टीत सुद्धा ग्राहक फसल्या जात असतो अनेक व्यापारी कमी वेळेत जास्तीत जास्त नफा च्या उद्देशाने अनेक ग्राहकांना फसवत असतात त्यामुळे ग्राहक अनेकदा फसले जातात परंतु अनेक वेळा ग्राहक देखील याकडे कानाडोळा करतो त्यामुळे अनेक व्यापारी यांचे पावले जात असते. ग्राहक खरेदी फसल्यास ग्राहक तक्रार मंचाकडे देखील तक्रार करू शकतो ग्राहक तक्रार मंचाची अनेकांना माहिती नाही तर काहींना माहिती असून सुद्धा याचा फायदा घेत नाही त्यामुळे जागरूक नागरिक होणे गरजेचे आहे.आज जागतिक ग्राहक दिन आहे जागरूक ग्राहक होणे ही काळाची गरज आहे जागरूक ग्राहक असल्यास अनेक ग्राहक देखील या फसवेगिरी पासून वाचण्यास मदत होईल अनेक नागरिक तक्रार देखील करत नाहीत ग्राहकांचे अनेक कायदे झाले आहेत अनेक बदल आता सध्या होत आहेत .परंतु नागरिकांना याची माहिती होत नाही त्याचबरोबर अनेक शासकीय कामकाज बाबत देखील नागरिक फसत असतात शासकीय सेवा घेत असतात अनेक ठिकाणी शासकीय सेवेमध्ये नागरिकांना नाहक वेळेमध्ये फसवले जाते नागरिकांना वेळेत अडविले जाते दोन पैसे मिळावा भ्रष्टाचाराच्या माध्यमातून अनेक अधिकारी सुद्धा नागरिकांचे काम थांबवरात. सरकारी ठिकाणांमध्ये अनेक काम केले जात असतात आणि नागरिक एक प्रकारे ग्राहक समजला जात असतो परंतु नागरिकांनी देखील जागरूक असते गरजेचे आहे अनेक ठिकाणी पैसे घेऊन कामे केली जात असतात अशावेळी नागरिकांनी अँटी करप्शन ब्युरो या ठिकाणी संपर्क साधून अशा अधिकाऱ्यांना वटणीवर आणणे गरजेचे आहे त्यामुळे जागरूक नागरिक होणे हे गरजेचे आहे अनेक ठिकाणी पैसे देऊन कामे केले जात असतात त्यामुळे सुद्धा नागरिकांची लूट होत असते नागरिक जागृत झाल्यास अँटिक करप्शन च्या माध्यमातून सुद्धा अनेकांना वटणीवर आणल्या जाऊ शकते त्यामुळे आजच्या या जागतिक ग्राहक. दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा आणि जागरूक नागरिक होणे गरजेचे आहे आणि जागरूक नागरिक झाल्यास जागरूक ग्राहक देखील आपोआपच घडेल
लेखन,रवींद्र जगताप संपादक सत्य एक्सप्रेस
कोपरगाव ची महाशिवरात्र आनंदाची एक पर्वणी आणि कोपरगावच्या महाशिवरात्रीचे बदलते स्वरुप
सामान्य माणसाच्या खिशाला परवडेल असे मनोरंजन म्हणजे कोपरगावची जत्रा हा लेख अनेकांना आवडला अनेक नागरिकांनी चांगल्या प्रतिक्रिया ्दिल्या





