धार्मिक
कोल्हे कुटुंबियांनी दिल्या मुस्लिम बांधवाना ईदच्या शुभेच्छा
कोल्हे कुटुंबियांनी दिल्या मुस्लिम बांधवाना ईदच्या शुभेच्छा
कोपरगाव : प्रतिनिधी सहकार महर्षी, माजी मंत्री शंकररावजी गेणूजी कोल्हेसाहेब यांनी संपूर्ण आयुष्य हे समाज्यातील बंधुत्व, समता, ह्या विचारांचा अंगीकार केला, या मूल्यांचे जतन करण्याची शिकवण दिली. या मूल्यांची जोपासना करून सामाजिक ऐक्य जपत रमजान ईदच्या निमीत्ताने कोल्हे परिवारातील संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष श्री. बिपीनदादा कोल्हे, कोपरगाव मतदार संघाच्या प्रथम महिला आमदार मा. सौ. स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे आणि सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सह. कारखान्याचे चेअरमन विवेकभैय्या कोल्हे कोपरगाव शहरात विविध ठिकाणी जाऊन मुस्लिम बांधवाना शुभेच्छा दिल्या.

रमजान ईदच्या निमीत्ताने संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष श्री. बिपीन दादा कोल्हे यांनी कोपरगाव शहरातील कोर्टाजवळील ईदगाह मैदानावर जाऊन मुस्लिम बांधवाना शुभेच्छा देऊन संवाद साधला. तर कोपरगाव मतदार संघाच्या प्रथम महिला आमदार मा. सौ. स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे यांनी येसगाव येथे जात मुस्लिम बांधवाना शुभेच्छा देत, शिरखुर्म्याचा आस्वाद घेतला. तसेच सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सह. साखर कारखान्याचे चेअरमन तथा युवा नेते श्री. विवेकभैय्या कोल्हे यांनी कोपरगावातील हनुमाननगर भागात जाऊन मुस्लिम बांधवांशी संवाद साधत रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या तर चविष्ट रुचकर अशा शिरखुर्म्याचा मनस्वी आनंद घेतला.

स्व.कोल्हे साहेबांनी गेल्या ४० वर्षाच्या समाज कार्यात धार्मिक एकोपा ठेवला होता. त्याच्या हयातीमध्ये रमजान ईदचा एक उत्साह असायचा. तोच उत्साह हा श्री.बिपीन दादा कोल्हे, सौ.स्नेहलताताई कोल्हे व श्री. विवेकभैय्या कोल्हे यांनी जपत यंदाची मुस्लिम बांधवांची रमजान ईद मोठया आनंदात साजरी झाली याचा आनंद एका मुस्लिम बांधवाने व्यक्त केला. या प्रसंगी श्री. पराग संधान श्री. डि. आर. काले, श्री. राजेंद्र सोनवणे, श्री. जनार्दन कदम, श्री. प्रदिपराव नवले, श्री. विजयराव आढाव,श्री. गोपीनाथ गायकवाड, श्री. समीर गवळी, श्री. सतिश रानोडे, श्री. सचिन सावंत, डॉ. अनिल जाधव, श्री. गोरख देवडे, श्री. प्रभुदास पाखरे, श्री. शंकर बिऱ्हाडे, श्री. सुजल चंदनशिव, श्री. दिपक जपे, श्री खालिकभाई कुरेशी, श्री. फकिरमंहमद पहिलवान, श्री. अरिफभाई कुरेशी, श्री.शाहरुख शेख, श्री. अमिन शेख, श्री. हशमभाई शेख,श्री. रोहन दरपेल, श्री. सादिकभाई पठाण, श्री. जितेंद्र रणशुर,श्री. शफिकभाई सैय्यद, श्री दिपक वाजे, श्री रवींद्र रोहमारे, श्री. साईनाथ त्रिभुवन, श्री जितेश बत्रा, श्री विनय भागवत, श्री. अकबरभाई शेख, श्री इलियासभाई शेख, श्री सद्दामभाई सैय्यद, श्री राजु पठाण, श्री. वाहिदभाई पठाण, श्री जगदिश मोरे, श्री राजेंद्र बागुल, श्री. प्रसाद आढाव, श्री. संजयराव आढाव, श्री गणेशराव आढाव, श्री. कैलास शेळके, मौलाना हाजी आसिफ कुरेशी, मौलाना रियाझ सर, श्री राजेंद्र भंडारी, श्री. शरदनाना थोरात, श्री. प्रकाश शेळके श्री.नसीरभाई सय्यद, श्री.सद्दामभाई सय्यद, श्री.अल्ताफभाई कुरेशी, श्री.फिरोजभाई पठाण, श्री. अल्ताफभाई पठाण, श्री. जुबेरभाई खाटीक,श्री.अकिलभाई मेहंदी, श्री.नुरखाँभाई पठाण, श्री. रवींद्र पाठक, भाजयुमोचे शहराध्यक्ष श्री. सिद्धार्थ साठे, श्री. अविनाश पाठक, श्री. सोमनाथ म्हस्के, श्री. रोहित कणगरे, श्री. स्वप्नील मंजुळ, श्री. रुपेश सिनगर, श्री. हरूण पठाण, श्री.लखन म्हस्के, आदींसह मुस्लिम बांधव, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


