सामाजिक

पंडित जमनराव भारुड यांना शिवाजी महाराज जीवन गौरव पुरस्कार प्रदान

पंडित जमनराव भारुड यांना शिवाजी महाराज जीवन गौरव पुरस्कार प्रदान

कोपरगाव तालुक्यातील पंडित जमनराव भारुड यांना सम्राट फाउंडेशन महाराष्ट्र राज्य व आदेश फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमानाने छत्रपती शिवाजी महाराज जीवन गौरव पुरस्कार 2024 नुकताच  महेश डाळिंबकर संचालक कायझेन अकॅडमी , एडवोकेट बी ए हुसळे हायकोर्ट  , लक्ष्मण सहाने डायरेक्टर ऑफ सेव्हलोन लिमिटेड मुंबई अध्यक्ष राहुल सोनवणे आदर्श फाउंडेशनचे सुनील मोकळ आदींच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज जीवनगौरव पुरस्कार 2024 प्रधान भारुड यांना प्रदान करण्यात आला असून पंडितराव भारुड यांनी आत्तापर्यंत साहित्यिक, सामाजिक ,शैक्षणिक , उद्योजकता या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेले असून ते सातत्याने छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचा प्रचार आणि प्रसार क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले मागासवर्गीय वाचनालय मंडळ संवत्सर यांच्या वतीने सातत्याने महापुरुषाच्या जयंती पुण्यतिथी कार्यक्रम घेत असतात . त्याचप्रमाणे त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन पर गंडेतोडे ही अंधश्रद्धा निर्मूलन पर कादंबरी विद्रोही कविता संग्रह *लाव्हा* महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित क्रांतीसुर्य नावाचं प्रबोधनात पुस्तक , प्रिंटेड सर्किट बोर्ड , कै. माजी मंत्री शंकरराव कोल्हे साहेब यांच्या जीवनावर विजयीगाथा नावाची चित्रफित देखील तयार केलेली आहे . त्याचप्रमाणे भारुड हे पत्रकारितेच्या माध्यमातून अनेक समस्या वृत्तपत्रातून नेहमी मांडत असतात.भारुड यांचे विविध क्षेत्रातले उल्लेखनीय काम पाहून सम्राट फाउंडेशन व आदेश फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांनी छत्रपती शिवाजी महाराज जीवन गौरव पुरस्कार 2024 हा पंडितराव भारुड यांना प्रदान केला .या यशाबद्दल त्यांचे पहिल्या महिला आमदार स्नेहलता बिपिन दादा कोल्हे, संजीवनी उद्योग समूहाचे संस्थापक बिपिन दादा कोल्हे, औद्योगिक वसाहतीचे चेअरमन मा. श्री बिपिन दादा कोल्हे त्याचप्रमाणे संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट चे आद विश्वस्त नितीन दादा कोल्हे विश्वस्त अमित दादा कोल्हे व ग्रामस्थांनी भारुड यांचे अभिनंदन केले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे