युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त खाटांचे वाटप
विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा झाला वाढदिवस
कोपरगाव : प्रतिनिधी:-सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन तथा संजीवनी युवा प्रतिष्ठाणचे अध्यक्ष युवा नेते विवेक भैय्या कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त कोपरगाव शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर वस्तीगृहास (दि.२७) शनिवारी रोजी विद्यार्थ्यांना खाटांचे विवेकभैय्या कोल्हे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

सहकार महर्षी स्व.शंकरराव कोल्हे यांच्या विचारांचा वारसा घेऊन समाजसेवा हाच धर्म या मुलमंत्राचा जोपासना कोल्हे परिवार समाज सेवा करीत आहे, या तत्वाची जोपासना करणाऱ्या विवेक कोल्हे यांना वाढदिवसाचे औचित्य साधत विविध ठिकाणी सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. त्यामध्ये संजीवनी युवा प्रतिष्ठाणच्या वतीने काल शिर्डी येथे फिरत्या दवाखान्याच्या माध्यमातून द्वारकामाई वृद्धाश्रमात वृद्ध महिला व पुरुषांची मधुमेह, रक्त दाबाची तपासणी करण्यात आली. तर वृद्धांना मोफत गोळ्या औषधांचे वाटप करण्यात आले. याकामी डॉ. सुजित सोनवणे, भूषण जावळे यांचे सहकार्य लाभले. तर संजीवनी कॉल सेंटर येथे रक्तदान शिबीर आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात सुमारे शेकडो रक्तदात्यांनी रक्तदान करीत विवेक कोल्हे यांना सामाजिक कार्याच्या शुभेच्छा व्यक्त केल्या. तसेच गांधीनगर भागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहातील विद्यार्थ्यांना मोफत खाटांचे वाटप करण्यात आले.

या प्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहाच्या प्रारंगणात आयोजित सत्कार समारंभादरम्यान वंचित बहुजन आघाडीच्या उत्कर्षाताई रुपवते, डॉ. चेतन लोखंडे, श्री. पराग संधान,श्री. दत्ता काले, श्री. रवींद्र पाठक, श्री.राजेंद्र सोनवणे, श्री.विनोद राक्षे, श्री. भीमा संवत्सरकर, श्री. जनार्दन कदम, श्री. सिद्धार्थ साठे,श्री. सोमनाथ म्हस्के, श्री.रवींद्र रोहमारे, श्री. गोपिनाथ गायकवाड, श्री.शरद खरात, श्री. प्रशांत कडू, श्री. राजेंद्र बागुल, श्री. सतीश रानोडे, श्री. जयप्रकाश आव्हाड, श्री. अहमदभाई बेकरीवाले, श्री. वैभव गिरमे, श्री. अनिल गायकवाड, श्री. शफिक सय्यद, श्री. विष्णुपंत गायकवाड, श्री. नारायण गवळी, श्री. विजय चव्हाणके, श्री. सलीम पठाण, श्री. लियाकत सय्यद, श्री. भानुदास पवार, श्री. रमेश भोपे, श्री. दादासाहेब नाईकवाडे, श्री. रामचंद्र साळुंके, डॉ.अनिल जाधव, श्री. मुख्तार पठाण, श्री. अमोल राजूरकर, श्री. शरद त्रिभुवन, श्री. हुसेन सय्यद, श्री. राजेंद्र गंगोले, श्री.रुपेश सिनगर, श्री. रवींद्र लचुरे, श्री. रोहित कनगरे, श्री. विक्की मंजुळ, श्री. इलियास खाटीक, सिद्धू भाटिया,श्री.अण्णा नरोडे, श्री. सागर कोपरे, श्री. शुभम गवारे, श्री.सचिन सावंत, श्री. सुशांत घोडके, श्री. गोरख देवडे, श्री. मुन्ना दपरेल, श्री. सुजल चंदनशिव, श्री. श्री. आढाव, श्री. विक्रांत सोनवणे, श्री. शरद खरात, श्री. मयूर जोभनपुत्र, श्री. सोमेश कायस्थ, श्री. नरेंद्र लकारे, श्री. आनंद जगताप, श्री. आयाज शेख आदींसह युवा कार्यकर्ते उपस्थित होते.



