अहमदनगर काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभाग जिल्हा अध्यक्षपदी बंटी यादव यांची नियुक्ती..
अहमदनगर काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभाग जिल्हा अध्यक्षपदी बंटी यादव यांची नियुक्ती...
संगमनेर (प्रतिनिधी) अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या अहमदनगर जिल्हा अध्यक्ष पदी संगमनेर येथील बंटी यादव यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली देशभरातील राजकारणातील ढवळाढवळ बघता बंटी यादव यांची पक्षातील कामगिरी चमकदार ठरली ते जिल्ह्यात काँग्रेस पक्षाची विचारधारा जनसामान्यांपर्यत पोहोचविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहे. विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे गट नेते आ.बाळासाहेब थोरात यांचे अहमदनगर जिल्ह्यातील काँग्रेसचे विश्वासू कार्यकर्ते म्हणून समजले जातात व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्षडॉ.सिद्धार्थ हत्तीआंबिरे यांच्या नेतृत्वाखालील त्यांची निवड झाल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
यावेळी त्यांच्या निवडीचे अभिनंदन माजी आमदार डॉ. सुधीर तांबे. आमदार सत्यजित तांबे, संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्ष जयश्री थोरात, कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष जयंत वाघ,शिर्डी संस्थानाचे माजी विश्वस्त नामदेव गुंजाळ, जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष संतोष गायकवाड, यावेळी आधी सर्वच काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले.





