गुन्हेगारी

१७०० किलो गोमांस जप्त,कोपरगाव शहर पोलिसांची मोठी कारवाई

१७०० किलो गोमांस जप्त,कोपरगाव शहर पोलिसांची मोठी कारवाई

संपादक:- रवींद्र जगताप

समृद्धी महामार्गावरील शिर्डी टोलनाक्यावर १७०० किलो गोमांसाची वाहतूक करणाऱ्या वाहनास पोलिसांनी पकडले. याप्रकरणी कुर्ला येथील दोघांना अटक करण्यात आली आहे. ही घटना शनिवारी (२७ एप्रिल) रात्री बारा वाजेच्या सुमारास घडली.घटनेबाबत पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, शनिवारी रात्री समृद्धी महामार्गावरील शिर्डी टोलनाक्यावर (एमएच ४३ बीएक्स ८७८५) क्रमांकाचे वाहन पोलिसांच्या निदर्शनास पडले. पोलिसांना शंका आल्याने त्यांनी चालकाची चौकशी केली असता, चालक व त्याच्या साथीदाराने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता, आत गोवंशीय जनावरांचे मांस असल्याचे आढळले. याप्रकरणी पोलिसांनी मोहमंद कैफ शरिफ
कुरेशी (वय २०, रा. कुर्ला, पूर्व मुंबई) व रिजवान मलंग कुरेशी (वय ३६, रा. कुर्ला पूर्व मुंबई) यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी २ लाख ७० हजार रुपयांचे १७००
किलो गोमांस व ६ लाख रुपये किमतीचे वाहन जप्त केले. पो.हे.कॉ. दिगंबर जयसिंग शेलार यांच्या फिर्यादीवरून कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात दोघांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा अधिक तपास पो.हे.कॉ. के. ए. जाधव करीत आहेत.

 

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे