राजकिय

“मागील पंधरा वर्षे मतदारांना फसवले आता त्यांना फसवायची वेळ आली”- ॲड. नितीन पोळ

“मागील पंधरा वर्षे मतदारांना फसवले आता त्यांना फसवायची वेळ आली”- ॲड. नितीन पोळ

आता दगडाला उभे केले तरी निवडून दिवस राहिले नाही ज्यांनी पंधरा वर्षे मतदारांना फसवले त्यांना फसवायची वेळ आली आहे असे आवाहन शिर्डी लोक सभा मतदार संघाचे बहुजन भारत पार्टी चे उमेदवार ॲड. नितीन पोळ यांनी व्यक्त केले शिर्डी लोक सभा मतदार संघ साखर सम्राट व शिक्षण सम्राट यांचा मतदासंघ आहे मात्र मागील पंधरा वर्षापूर्वी हा मतदारसंघ अनुसूचित जाती साठी आरक्षित करण्यात आला त्यावेळी मतदार संघातील साखर सम्राट यांनी स्वतःच्या सोयीचा उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले मात्र पंधरा वर्षात निवडून गेलेल्या आजी माजी खासदारांनी या मतदार संघातील जनतेच्या अपेक्षा पूर्ण केल्या नाही त्यामुळे ठिकठिकाणी या उमेदवारांना जनतेने नाकारले आहे निवडून गेल्यावर हे उमेदवार फक्त निवडणुक आली म्हणुन जनतेला सामोरे जात असून मतदार संघातील साखर सम्राट व शिक्षण सम्राट यांनी दगड उभा केला तरी निवडून आणू या भ्रमात राहू नये कारण मागील पंधरा वर्षात दोन्ही उमेदवारांनी मतदारांचा भ्रम निराश केला असून जनतेने भरघोस मतांनी विजयी केले तरी या उमेदवारांनी जनतेला फसवले आहे त्यामुळे या मतदासंघातील मतदार नवीन चेहऱ्याला पसंती देणार यात कोणतीही शंका नाही त्यामुळे ज्यांनी पंधरा वर्षात निवडून गेल्यावर जनतेला फसवले त्यांना मतदार फसवल्या शिवाय राहणार नाही असे चित्र निर्माण झाले आहे

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे