“लाटेवर निवडून आलेले उमेदवार यंदा लाटेत वाहून जातील”- ॲड. नितिन पोळ
“लाटेवर निवडून आलेले उमेदवार यंदा लाटेत वाहून जातील”- ॲड. नितिन पोळ
सण २००९ च्या. निवडणुकीत आठवले विरोधी लाटेवर व २०१४ व २०१९ ला मोदी लाटेवर निवडून आलेले उमेदवार यंदाच्या निवडणुकीत जन विरोधी लाटेत वाहून जातील असा विश्वास बहुजन भारत पार्टी चे उमेदवार ॲड नितीन पोळ यांनी व्यक्त केला
पोळ पुढे म्हणाले की सण २००९ ला शिर्डी लोक सभा मतदार संघातून रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांनी उमेदवारी केली मात्र शिर्डी लोक सभा मतदार संघातील नेत्यांनी आठवले यांच्या विरुद्ध लाट निर्माण केली त्या लाटेवर मतदार संघातून कोणतेही काम नसताना भाऊसाहेब वाकचौरे निवडून गेले मात्र त्यांनी २०१४ पक्षांतर केले आणि सदाशिव लोखंडे मोदी लाटेवर निवडून गेले त्याच प्रमाणे पुन्हा एकदा २०१९ ला लोखंडे यांना मोदी लाटेने वाचवले असे असले तरी त्यांनी मागील दहा वर्षात मतदार संघातून कोणतेही ठोस काम केले नाही त्यामुळे यंदा या दोन्ही उमेदवारां विरुद्ध मतदारांच्या मनात प्रचंड असंतोष धुमसत आहे तर या विरोधी लाटेवर स्वार होऊ पाहत असलेल्या वंचित आघाडीच्या उमेदवार यांना मतदार संघातील मतदार स्विकातात की आठवलेंची पुनरावृत्ती करतात असे असले तरी ठीक ठिकाणी बहुजन भारत पार्टी चे उमेदवार असण्या पेक्षा मतदार संघाचे प्रश्न जाणून घेऊन अनेक मोर्चे आंदोलने यांच्या माध्यमातून सतत संघर्ष करत असताना जनतेने माझ्या उमेदवारीचे स्वागत केले आहे. तसेच कोपरगाव तालुक्यातून २८ वर्षा पूर्वी जनतेने प्रस्थापित नेत्याला धक्का देत सर्व सामान्य असलेल्या लढवय्या ॲड भिमराव बडदे यांना लाटेवर स्वार करून खासदार केले होते या घटनेची पुनरावृत्ती होऊ शकते असा विश्वास व्यक्त केला




