राजकिय

शिर्डी लोकसभेसाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कडे राजेंद्र वाघमारे योग्य उमेदवार.  – नितीन शिंदे

शिर्डी लोकसभेसाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कडे राजेंद्र वाघमारे योग्य उमेदवार.  – नितीन शिंदे

संपादक रविंद्र जगताप
दिनांक २६/६/२०२३ रोजी कोपरगाव तालुका दौरा जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाघमारे यांनी केला असता यावेळी कोपरगाव तालुका काँग्रेस कमिटीचे माजी तालुकाध्यक्ष सरचिटणीस,महाराष्ट्र राज्य प्रदेश काँग्रेसचे नितीन शिंदे यांच्या उपस्थितीत व अध्यक्षतेखाली बैठकीत ते बोलत होते.गेली अनेक वर्ष काँग्रेसमध्ये काम करणारे राजेंद्र वाघमारे हे मितभाषी आणि सर्वांशी अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध व सामान्य लोकांच्या प्रश्नांची जाण असलेले, अहमदनगर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व सभापती व सध्या अजा विभाग जिल्हाध्यक्ष पदाचा अनुभव असलेली वाघमारे काँग्रेस कडून अत्यंत योग्य उमेदवार असल्याने आणि त्यांच्या मागे कायम कोपरगाव तालुका काँग्रेस  भक्कमपणे उभी असून त्यांच्या उमेदवारीसाठी पक्ष श्रेष्ठींकडेही मागणी करणार आहोत असे मत नितीन शिंदे यांनी व्यक्त केले
 यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव बंटी भाऊ यादव, अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाघमारे, जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष संतोष भाउ गायकवाड,सांस्कृतिक काँग्रेसचे प्रदेश.सचिव कडू, किसान काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष विजय जाधव, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष यादव अण्णा  त्रिभुवन, तालुका काँग्रेसचे सोपान धनक, कोपरगाव काँग्रेसचे छबुराव शिंगाडे साहेब, युवा काँग्रेसचे वैभव वाघमारे, खरात आधी पदाधिकारी उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका काँग्रेसचे अध्यक्ष चंद्रकांत बागुल यांनी केले,तर आभार सोपान धनक यांनी मानले.

ताज्या बातम्यासाठी आमच्या व्हाटसाँप ग्रुपवर सहभागी व्हा,सहभागी होण्यासाठी खालिंल लिंक दाबा https://chat.whatsapp.com/CTDmmJtLO0G0xxPjGv1gcS

जाहिरात
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे