देर्डे-चांदवड सोसायटीत परिवर्तन कोल्हे गटाची सत्ता काळे गटाने हिसकावलीजिल्हा बँक निवडणूकी नंतर झाले पहिले सत्तांतर
देर्डे-चांदवड सेवा सोसायटीच्या निवडणुकीत विजय मिळविल्यानंतर काळे गटाचे सर्वच्या सर्व ११ उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून आल्यानंतर गुलाल उधळून जल्लोष करतांना काळे गटाचे कार्यकर्ते
देर्डे-चांदवड सोसायटीत परिवर्तन कोल्हे गटाची सत्ता काळे गटाने हिसकावलीजिल्हा बँक निवडणूकी नंतर झाले पहिले सत्तांतर
कोपरगाव प्रतिनिधी – कोरोना संकटाचे मळभ दूर झाल्यानंतर सहकारी सोसायट्यांच्या निवडणुका सुरू झाल्या. या निवडणुकांमध्ये ज्या त्या गटाने त्यांच्या सोसायट्यांमध्ये सत्ता अबाधित ठेवून आपले गड शाबूत ठेवले असले तरी कोपरगाव तालुक्यातील देर्डे-चांदवड सोसायटीची निवडणूक मात्र याला अपवाद ठरली आहे. कोल्हे गटाच्या सत्तेला काळे गटाने सुरुंग लावून सोसायटीच्या निवडणुकीत परिवर्तन घडवले आहे. त्यामुळे सोसायटीवर असलेली कोल्हे गटाची सत्ता संपुष्टात येऊन काळे गटाने ही सोसायटी कोल्हे गटाकडून हिसकावलीआहे.कोपरगाव तालुक्यातील देर्डे-चांदवड विविध कार्यकारी सेवा सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत माजी आमदार अशोकराव काळे व श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली काळे गटाचे सर्वच्या सर्व १२ उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून आले असून निवडणुकीपूर्वी देखील काळे गटाचा एक सदस्य बिनविरोध निवडून आला आहे त्यामुळे सर्वच्या सर्व १३ जागा काळे गटाने जिंकल्या आहेत.कोल्हे गटाचे सर्व उमेदवार पराभूत होवून कोल्हे गटाने या सोसायटीची सत्ता गमविली आहे.यामध्ये काळे गटाचे निवडून आलेले उमेदवार पुढीलप्रमाणे कोल्हे भाऊसाहेब पुंजाजी,शितोळे दादासाहेब शुक्लेश्वर, होन शिवाजी चंद्रराव, गुंड सतीश पोपटराव, कोल्हे बबन दगडू,होन ज्ञानदेव बाजीराव, होन भाऊसाहेब सखाराम, कोल्हे प्रभाकर भास्करराव, विघे विष्णुपंत रंगनाथ, सौ.कोल्हे मनीषा सुभाष, सौ.कोल्हे सुनिता संजय मेहेत्रे सचिन शांताराम यांचा समावेश आहे.निवडून आलेल्या सर्व नवनिर्वाचित उमेदवारांचे व निवडणुकीत विजय मिळविण्यासाठी परिश्रम घेतलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे माजी आमदार अशोकराव काळे व श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी अभिनंदन केले आहे.




