सोमैया महाविद्यालयात प्राध्यापक प्रबोधिनी अंतर्गत आंतरराष्ट्रीय व्याख्यानाचे आयोजन

सोमैया महाविद्यालयात प्राध्यापक प्रबोधिनी अंतर्गत आंतरराष्ट्रीय व्याख्यानाचे आयोजन
कोपरगाव: स्थानिक के. जे. सोमैया महाविद्यालयाच्या प्राध्यापक प्रबोधिनी व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय व्याख्यानाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. याप्रसंगी
या कार्यक्रमासाठी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे दोन मान्यवर वक्त्यांनी मार्गदर्शन केले. डॉ. ए. इबेमचा चानू* (प्राध्यापक, वाणिज्य विभाग तसेच अधिष्ठाता, वाणिज्य व व्यवस्थापन अध्ययन संकाय, बोडोलँड विद्यापीठ, आसाम) यांनी “कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगातील सजग अध्यापन आणि अध्ययन” (“Mindful Teaching and Learning in the Era of AI”) या विषयावर मार्गदर्शन करताना वर्तमान कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात अध्यापन–अध्ययन प्रक्रियेत सजगता, मानवी मूल्ये आणि शैक्षणिक गुणवत्ता जपण्याचे महत्त्व अधोरेखित केले.

दुसऱ्या सत्रात प्रा. लक्ष्मण प्रसाद भंडारी(लुंबिनी बनिज्य कॅम्पस, त्रिभुवन विद्यापीठ, नेपाळ) यांनी ” नेपाळ मधील उच्च शिक्षणाची सद्यस्थिती” (“Higher Education Situation in Nepal”) या विषयावर नेपाळमधील उच्च शिक्षणाची सद्यस्थिती, आव्हाने, सुधारणा आणि भारत–नेपाळ शैक्षणिक सहकार्याच्या संधी यावर सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी भारतातील राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांचे नेपाळच्या शैक्षणिक धोरणावर कसे परिणाम झाले आहेत, हे देखील स्पष्ट केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. (डॉ.) विजय ठाणगे होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ ठाणगे यांनी अशा आंतरराष्ट्रीय पातळीवरील शैक्षणिक संवादामुळे प्राध्यापक व विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दृष्टिकोन अधिक व्यापक होतो, असे नमूद केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व मान्यवरांचा परिचय डॉ. रवींद्र जाधव यांनी करून करून देताना महाविद्यालयाच्या प्राध्यापक प्रबोधिनी मार्फत अनेक महत्वाच्या विषयावर अशी व्याख्याने आयोजित केले जातात असे नमूद केले. तर कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी डॉ. नामदेव ढोकळे यांनी उपस्थितांचे व मान्यवरांचे आभार मानले.या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद, संशोधकांच्या व विद्यार्थ्यांची लक्षणीय उपस्थिती होती. प्रश्नोत्तर सत्रात उपस्थितांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून कार्यक्रम यशस्वी केला.



