देश-विदेश

शंकर दुपारगुडे यांना “द पिलर्स ऑफ हिंदुस्तानी सोसायटी पुरस्कार जाहीर.

शंकर दुपारगुडे यांना “द पिलर्स ऑफ हिंदुस्तानी सोसायटी पुरस्कार जाहीर.

दुपारगुडे यांच्या पञकारीतेतील योगदानाची राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल

कोपरगाव प्रतिनिधी दि. २१: गेल्या अनेक वर्षांपासून पञकार शंकर दुपारगुडे यांच्या पञकारीतेतील योगदानाची दखल घेवून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्य करणारी संस्था ट्रान्स एशियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री” व “इंडो-मंगोलियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री या संस्थेच्या वतीने शंकर दुपारगुडे यांना “द पिलर्स ऑफ हिंदुस्तानी सोसायटी अवॉर्ड्स २०२६” हा पुरस्कार जाहीर झाला असुन ग्रामीण भागातील उत्कृष्ट पञकारीतून केलेल्या कार्याची पावती दुपारगुडे यांना या पुरस्काराच्या रुपाने मिळाली आहे. हा पुरस्कार सोहळा २४ फेब्रुवारी रोजी मुंबईत येथे जगातील १४ पेक्षा अधिक देशातील मान्यवरांच्या हस्ते प्रदान केला जाणार आहे.या संदर्भात अधिक माहीती देताना ट्रान्स एशियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री” आणि “इंडो-मंगोलियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री” या संस्थेचे सचिव व आयोजक डॉ. संजय भिडे म्हणाले की,ट्रान्स एशियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री” आणि “इंडो-मंगोलियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री” यांच्या संयुक्त विद्यमाने दोन्ही चेंबर्सचा अनुक्रमे २७ वा व ३२ वा वर्धापन दिन सोहळा मंगळवार, दि. २४ फेब्रुवारी २०२६ रोजी सायं. ६.३० वाजता गेटवे ऑफ इंडिया, मुंबई येथील रॉयल मुंबई यॉट क्लबच्या सभागृहात संपन्न होणार आहे.या सोहळ्यात “द पिलर्स ऑफ हिंदुस्तानी सोसायटी अवॉर्ड्स २०२६” प्रदान करून विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा गौरव करण्यात येणार आहे. त्यात पञकार शंकर दुपारगुडे यांनी ग्रामीण भागातील जनमाणसांच्या अनेक समस्यां मांडून लक्षवेधी कार्य केले आहे. त्या बद्दल त्यांना द पिलर्स ऑफ हिंदुस्तानी सोसायटी या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. सोबतच संगित, कला , सामाजिक, महीला सक्षमीकरण, वैद्यकीय, मिडिया, लेखन, उद्योग, पञकारीता, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर उद्योग कला, संस्कृती, शिक्षण, समाज प्रबोधन, लोककला क्षेञात अतुलनीय कार्य करुन योगदान देणाऱ्या ३३ मान्यवरांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. या पुरस्कार वितरण सोहळ्याला
मरियानो ऑगस्टिन काउचिनो – अर्जेंटिनाचे राजदूत
न्यायमूर्ती श्रीहरी दावरे हे प्रमुख अतिथी आहेत तर
इव्हान फेटिसोव्ह – कन्सुल जनरल( रशियन) फेडरेशन, पॉल मर्फी – कन्सुल जनरल (ऑस्ट्रेलिया),केमालेत्तिन एरयिगुन – कन्सुल जनरल(तुर्की), ली क्वांग बियेन – कन्सुल जनरल (व्हिएतनाम)
श्री. अलियासान्दार मात्सुकोउ – कन्सुल जनरल, (बेलारूस), गेडिओन लाबाने – कन्सुल जनरल, (दक्षिण आफ्रिका)
सईद मोटलेह – कन्सुल जनरल (इराण)
इकरामुद्दीन कामिल – कार्यवाहक कन्सुल जनरल, (अफगाणिस्तान)फरहाना अहमद चौधरी – उप उच्चायुक्त (बांग्लादेश) यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे .भारतासह,रशिया, ऑस्ट्रेलिया, तुर्की, दक्षिण आफ्रिका, इराण, चिन, व्हिएतनाम, बेलारूस, मेक्सिको, श्रीलंका, अर्जेंटिनासह
१४ पेक्षा अधिक देशांचे राजदूत, वाणिज्य दूत, उच्चायुक्त तसेच उद्योग, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. हा सोहळा आंतरराष्ट्रीय व्यापार, सांस्कृतिक देवाणघेवाण आणि सामाजिक बांधिलकी दृढ करणारा महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे.
विविध देशांतील प्रतिनिधी आणि मान्यवरांच्या उपस्थितीमुळे भारताचे जागतिक स्तरावरील संबंध अधिक दृढ होणार आहेत असेही डॉ. संजय भिडे यांनी सांगितले.

 पुरस्काराचे मानकरी

1. श्री. अहसान अहमद – हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत (गायन)
2. सौ. कांचन अधिकारी – इलेक्ट्रॉनिक मीडिया
3. डॉ. समीर आचार्य – वैद्यकीय क्षेत्र (रेडिओलॉजी)
4. सौ. श्रुती भावे चितळे – व्हायोलिन वादन
5. सौ. निधी चौधरी – नैतिक प्रशासनिक सेवा
6. श्री. अविनाश धर्माधिकारी – समाजजागृती व भ्रष्टाचारविरोधी अभियान
7. सौ. लॉरेटा एव्हलिन डेरिन – आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक संबंध
8. सौ. प्रमिला दातार – सुगम संगीत
9. श्री. शंकर राम दुपारगुडे – ग्रामीण पत्रकारिता
10. डॉ. निलम गाडा – मानसोपचार व व्यसनमुक्ती कार्य
11. सौ. आशा गोखले – महिला सक्षमीकरण
12. पाओ चिन हु – प्राणी संरक्षण
13. सौ. बिजाया जेना – मनोरंजन क्षेत्र
14. श्री. संजय जोशी – नाणे व चलन संकलन
15. सौ. मोना कामत-प्रभुगावकर – सुगम संगीत
16. श्री. सुरेंद्र खचांची– हिंदुस्तानी हस्तकला प्रोत्साहन
17. श्री. प्रशांत कुलकर्णी – राजकीय व सामाजिक व्यंगचित्रकला
18. श्री. इक्बाल मुनिर खान – आंतरराष्ट्रीय बँकिंग सेवा
19. डॉ. बुधाजी राव मुळीक – कृषी नवकल्पना
20. श्री. चैतन्य मारपकवार – तपास पत्रकारिता
21. सौ. फ्लोरिंन म्युलर– भारत-स्वित्झर्लंड व्यापार प्रोत्साहन
22. श्री. जॉन निकेल – भारत-यूके सांस्कृतिक संबंध
23. श्री. आदित्य ओक – भारतीय शास्त्रीय हार्मोनियम
24. सौ. गिरिजा ओक-गोडबोले – अभिनय क्षेत्र
25. श्री. सत्यजित प्रभू – सिंथेसायझर वादन
26. कु. शालिनी पोद्दार – कॉर्पोरेट मीडिया
27. कु. वैष्णवी फाटक – कथ्थक नृत्य
28. डॉ. रेझा सईदेन – भारत-इराण व्यापार व सांस्कृतिक संबंध
29. सौ. उषा सोमण – ज्येष्ठ नागरिक प्रेरणा
30. श्री. चिंतन थोरात – राजकीय-आर्थिक सल्लागार
31. श्री. दीपक वासवानी – साहसी क्रीडा (सेलिंग)
32. श्री. जोय वेसावकर – सॅक्सोफोन वादन
33. श्रीमती नताली मेयरोथ – आंतरराष्ट्रीय पत्रकारिता

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे