प्रामाणिकपणा व इमानदारी ही आदिवासी समाजाची कवच कुंडली आहेत -पोलीस निरीक्षक वासुदेव देसले
प्रामाणिकपणा व इमानदारी ही आदिवासी समाजाची कवच कुंडली आहेत -पोलीस निरीक्षक वासुदेव देसले .
संपादक:- रविंद्र जगताप
कोपरगाव वार्ताहार :-आदिवासी समाजाचे प्रामाणिकपणा व इमानदारी ही या कवच कुंडले असून त्यामुळे हा समाज आजही समाजात सन्मानाने व विश्वासाने जीवन जगत आहेत. ” असे वक्तव्य श्री वासुदेव देसले साहेब, पोलीस निरीक्षक, तालुका ग्रामीण पोलीस स्टेशन कोपरगाव यांनी कोपरगाव तालुक्यातील सर्व आदिवासी कर्मचाऱ्यांनी एकत्र येत जागतिक आदिवासी दिन साजरा केला . कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून माननीय वासुदेव देसले साहेब पोलीस निरीक्षक यांनी व्यक्त केले. ते पुढे म्हणाले की-” आदिवासी समाज कायमच शांतताप्रिय व समाज हिताचे काम करणारा आहे . समाजाला कधी त्रास देणारे वर्तन केलेले नाही .स्वातंत्र्यकाळामध्ये आदिवासी समाजातील स्त्री-पुरुषांनी केलेले कार्य कौतुकास्पद व पराक्रमाने भरलेले आहे . आदिवासी समाजातील समस्यांकडे जगाने व्यापक दृष्टीने पहावे ,यासाठी जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात येत ,असून समाजातील प्रत्येक शिकलेल्या व आर्थिक दृष्ट्या सक्षम झालेल्या नोकरदार वर्गाने आपल्या समाजातील सर्व घटकांना प्रगती पथावर आणण्यासाठी व त्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सार्वत्रिक प्रयत्न करण्याची गरज आहे व त्याची सुरुवात कोपरगाव येथील सर्व आदिवासी कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन केलेली आहे ही सुरुवात कौतुकास्पद आहे .त्याबद्दल मी त्यांचे जाहीर कौतुक करतो व जागतिक आदिवासी दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो ,”असे मनोगत त्यांनी याप्रसंगी व्यक्त केले . यावेळी प्रतिमा पूजन करण्यात आले व लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम आदिवासी गीत गायन करण्यात येऊन पारंपारिक नृत्य सर्व आदिवासी बंधू भगिनींनी केले .तर यावेळी आदिवासी साहित्याचे अभ्यासक श्री. हनुमंत पदमिरे यांनी आपल्या ओघवत्या भाषेत आदिवासी संस्कृती व पराक्रम सांगितला व उपस्थितांना समाजासाठी सदैव तत्पर राहण्याचे आवाहन केले या कार्यक्रमाप्रसंगी सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पावरा साहेब ,शहर पोलीस स्टेशन शेवगाव ,श्री.राजेंद्र चौरे ,नायब तहसीलदार कोपरगाव , श्री.देविदास गायकवाड साहेब, सेवानिवृत्त सहाय्यक गट विकास अधिकारी ,ज्येष्ठ मार्गदर्शक बाळू बांडे सर, डॉक्टर गणेश ठोंबरे ,(मेंदू व हृदय रोग तज्ञ) कोठारी हॉस्पिटल कोपरगाव, अमित आगलावे जिल्हाध्यक्ष आदिवासी महादेव कोळी समाज संघटना अहमदनगर जिल्हा, श्री ज्ञानेश्वर वाकचौरे सर ,साई ग्रुप कोपरगाव इत्यादी प्रमुख पाहुणे उपस्थित होते. जागतिक आदिवासी दिनानिमित्त साधून एकलव्य आदिवासी आश्रम शाळा टाकळी तालुका कोपरगाव येथील 400 विद्यार्थ्यांना स्वादिष्ट मिठाईचे वाटप करण्यात आले . कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आदिवासी समाजाचे जेष्ठ मार्गदर्शक श्री महारु चव्हाण साहेब होते .कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री मनोहर शिंदे यांनी केले तर आभार रयत शिक्षक बँकेचे संचालक सन्माननीय दिपक भोये सर यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील पोरे व नारायण चौरे सर यांनी केले कार्यक्रमासाठी तालुक्यातून सुमारे चारशे कुटुंब सहपरिवार कार्यक्रम साठी उपस्थित होते कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी सर्व आदिवासी कर्मचारी बांधवांनी प्रयत्न केले



