ब्रेकिंग

ग्रामदैवत श्री लक्ष्मीआई मातेच्या आशीर्वादानेशहर विकासाला प्रेरणा – आ. आशुतोष काळे

कोपरगाव येथे ग्रामदैवत श्री लक्ष्मीआई माता यात्रौत्सवानिमित्त पंक्तीमध्ये भक्तांना महाप्रसादाचेवाटप करतांना  आ. आशुतोष काळे

ग्रामदैवत श्री लक्ष्मीआई मातेच्या आशीर्वादानेशहर विकासाला प्रेरणा – आ. आशुतोष काळे

कोपरगाव प्रतिनिधी  :- कोपरगाव शहरातील सर्व जाती धर्माच्या नागरिकांचे आराध्य दैवत असलेल्या ग्रामदैवत श्री लक्ष्मीआई मातेच्या आशीर्वादाने कोपरगाव शहराच्या विकासासाठी सातत्याने प्रेरणा मिळत असल्याचे प्रतिपादन आ. आशुतोष काळे यांनी केले.कोपरगावचे ग्रामदैवत श्री लक्ष्मीआई माता यात्रौत्सवानिमित्त आ. आशुतोष काळे यांनी श्री लक्ष्मीआई मातेच्या चरणी नतमस्तक होवून महाआरती करून आशीर्वाद घेतले. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या भव्य कीर्तन महोत्सवाप्रसंगी ह.भ.प. वनिताताई पाटील महाराज यांच्या किर्तनाचा त्यांनी लाभ घेतला. याप्रसंगी त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले कि, कोपरगाव शहराच्या विकासाचा अनुशेष भरून काढतांना पाणी, रस्ते, आरोग्य या त्रिसूत्रीवर भर देवून कोपरगाव शहराचा अनेक वर्षापासूनचा प्रलंबित असलेला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ५ नंबर साठवण तलावाच्या माध्यमातून ग्रामदैवत श्री लक्ष्मीआई मातेच्या आशीर्वादाने सोडविण्यात यश आले आहे. त्यामुळे लवकरच ५ नंबर साठवण तलावाचे काम पूर्ण झाल्यानंतर कोपरगावकरांना नियमित पाणी मिळणार आहे. यापुढील काळातही श्री लक्ष्मीआई मातेच्या प्रेरणेतून कोपरगाव शहरातील नागरिकांना अपेक्षित असलेल्या विकासाचे उर्वरित प्रश्न मार्गी लावू अशी ग्वाही आ. आशुतोष काळे यांनी यावेळी दिली. यात्रौत्सवानिमित्त भक्तांसाठी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले यावेळी आ. आशुतोष काळे यांनी देखील पंक्तीमध्ये भक्तांना महाप्रसादाचे वाटण्याची सेवा केली.

 

यावेळी ह.भ.प. शिवाजी महाराज ठाकरे, महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमचंद बागरेचा, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगूले, माजी नगरसेवक मंदार पहाडे, रमेश गवळी, ऋषीकेश खैरनार, सुनील फंड, अर्जुन दुबे, विकास आढाव, गोरख कानडे, संतोष शेलार, रोहित खडांगळे, गणेश कानडे, जर्नादन शिंदे, सोमेश शिंदे, मनोज नरोडे, नीरज ऊदावंत, मनोज विसपुते, महेश ऊदावंत, विनोद मोरस्कर, रमेश टोरपे, महेश मते, प्रदीप मते, अनिल शिंदे, प्रसाद सोनवणे, अमोल देवकर, राहुल कहार आदींसह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे