येसगाव जबरी चोरीतील आरोपीला चोवीस तासात केले जेरबंद तालुका पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी
आर.पी.आय तालुकाध्यक्ष जितेद्रं रणशूर यांनी केला सत्कार
कोपरगाव हद्दीतील नगर मनमाड हायवे जवळ येसगाव येथे एका ट्रॅक्टर चालकास दि.११ फेब्रुवारी २०२२ रोजी ४ अज्ञात चोरट्यांनी दमदाटी करून बळजबरीने त्याच्या ताब्यातील मोबाईल फोन व ट्रॅक्टर असा एकूण ५ लाख ५१ हजाराचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना नगर मनमाड हायवे येसगाव जवळ सायंकाळच्या सुमारास घडली असून त्याबाबद कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात चार अज्ञात चोरट्यान विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता याबाबत सविस्तर वृत्त असे की सुमारे साय.५ वाजेच्या सुमारास फिर्यादी हे कोपरगावहुन गवंडगाव ता.येवला येथे सोलीस कंपनीचा ट्रँक्टर जुगाड सह उस आणण्यासाठी जात असतांना पांढऱ्या रंगाच्या बोलेरो गाडीतील ४ अनोळखी चोरट्यांनी त्यांचे ट्रँक्टरला बोलेरो गाडी आडवी लावुन दमदाटी करुन फिर्यादीचे ताब्यातील ट्रँक्टर ५,५०,०००/-रुपये किंमतीचा लाल रंगाचा सोलीस कंपनीचा ट्रँक्टर त्याचा चेसी हिरव्या रंगाचा जुगाड नं.३१९ व रुपये १०००/- किंमतीचा काळ्या रंगाचा जीओ कंपनीचा मोबाईल फोन असा एकूण ५,५१,००/- रुपये किंमतीचा ऐवज बळजबरीने चोरुन नेला असल्याची फिर्यात बाबासाहेब सीताराम आहेर वय – ४९ धंदा ड्रायव्हर (रा. रस्ते सुरेगाव ता.येवला) यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दिली असून त्यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा रजि.नं ४५/२०२२ भादवि कलम ३९२,३४१,३४ प्रमाणे कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानुसार पोलिसांनी आपल्या तपासाची चक्रे फिरवली असता सदर ट्रॅक्टर चोर हा पुणे जिल्ह्यातील शिरूर या ठिकाणी असल्याची खबर समजतात कोपरगाव तालुका पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड पो काँ.इरफान शेख पो.काँ.आसिफ शेख यांच्या पथकाने सदर ठिकाणी जाऊन तपास करून सदर आरोपी च्या मुसक्या आवळल्या असून त्याला ताब्यात घेवुन कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनला आणून त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी घडलेल्या गुन्ह्याची संपूर्ण माहिती दिली. त्यावरून आज दिनांक १४ फेब्रुवारी २०२२ रोजी कोपरगाव न्यायालयात हजर करण्यात आले. या गुन्ह्यातील आरोपी चोवीस तासात अटक केल्याने तालुक्यातील नागरिकांनी तपास पथकातील पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड, पो.कॉ.इरफान शेख, पो. कॉ.शेख यांचा आर. पी. आय तालुकाध्यक्ष जितेंद्र रनशूर, बापू वाघमारे, विशाल कोपरे, उत्तम पगारे, पिंटू पगारे, बाबासाहेब आहेर आदींनी सत्कार करून अभिनंदन केले.