आरोग्य व शिक्षण

ब्रह्माकुमारीज परमात्मा अनुभुती भवन केंद्र साईनगर येथे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

राजयोग एज्युकेशन अँड रिसर्च फाऊंडेशन – माउंट अबूच्या वैद्यकीय शाखेकडून कोपरगाव शहरातील ब्रह्माकुमारीज परमात्म अनुभुती भवन केंद्र साईनगर यांच्या वतीने देशाच्या 75 व्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्ताने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवापासून ते सुवर्ण भारताकडे या मोहिमे अंतर्गत आज सोमवार  दिनांक 14 फेब्रुवारी 2022 रोजी ब्रह्माकुमारीज परमात्म अनुभुती भवन केंद्र साईनगर या ठिकाणी 55 वर्षा वरील नागरिकांकरीता निःशुल्क ऑर्थोपेडीक तपासणी, हाडांची ठिसुळता तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. हे शिबीर कोपरगाव शहरातील अस्थिरोग तज्ञ डॉ दीपक नाईकवाडे, डॉ अमित नाईकवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली संपन्न झाले आहे. या शिबिरास नागरीकांनी चांगला प्रतिसाद देत ब्रह्माकुमारीज परमात्म अनुभुती भवन कोपरगाव यांच्या या उपक्रमाचे विशेष कौतुक केले आहे.यावेळी डॉक्टर, नागरिक, सेवक व दीदी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे