ब्रेकिंग

इतरांच्या समस्यांवर आवाज उठविणारे पत्रकार आज सुरक्षित आहेत का ?

इतरांच्या समस्यांवर आवाज उठविणारे पत्रकार आज सुरक्षित आहेत का ?

अनेक ठिकाणी पत्रकारांवर दबाव तंत्राचा वापर; पत्रकार संघटनांनी एकत्र येण्याची गरज – उद्धव फंगाळ

समाधान बोडखे / बुलढाणा पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे शासन प्रशासन राजकारण समाजातील विविध घटना घडामोडी ह्या जनतेसमोर आणण्याचे काम सर्वच पत्रकार बांधव निस्वार्थपणे करीत असतात समाजात घडणाऱ्या चांगल्या वाईट घडामोडी आपल्या बातम्यांच्या माध्यमातून शासन व प्रशासनासमोर मांडण्याचा प्रयत्न करून सर्वसामान्यांना न्याय देण्याच काम पत्रकार बांधव नेहमीच करत आहेत मोठ्या शहरापासून तर अगदी ग्रामीण भागापर्यंत पत्रकार बंधू निस्वार्थपणे सेवा करत आहेत मात्र हे सर्व करत असताना सध्याच्या परिस्थितीत पत्रकार सुरक्षित आहेत का असे म्हणण्याची वेळ येत आहे महाराष्ट्रामध्ये अलीकडच्या काळात अनेक ठिकाणी पत्रकारावर हल्ले झाले आहेत मारहाण झालेली आहे पत्रकारावर दबाव तंत्राचा वापर करण्यात येत आहे सत्य बातमी किंवा वस्तुस्थितीला धरून जर बातम्या प्रकाशित केल्या तर त्या ठिकाणी त्या पत्रकाराला धमक्या सुद्धा येत आहेत त्यामुळे महाराष्ट्रामध्ये पत्रकार सुरक्षित आहेत का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे पत्रकार बांधवांसाठी महाराष्ट्रात आपापल्या परीने विविध संघटना काम करत आहेत या संघटना अतिशय चांगल्या रीतीने पत्रकारांचे संघटन मजबूत करून पत्रकारांचा मानसन्मान वाढावा समाजामध्ये पत्रकारांना चांगला सन्मान मिळावा चांगले स्थान मिळावे शासनाकडून पत्रकारांसाठी विविध योजना राबविण्यात याव्यात यासाठी सर्वच पत्रकार संघटना काम करत आहेत ही बाब अतिशय चांगली आहे मात्र काही ठिकाणी याला अपवाद सुद्धा दिसून येत आहेत ग्रामीण तथा तालुकास्तरावर अनेक पत्रकार निस्वार्थपणे व रोखठोक पद्धतीने म्हणजेच समाजात घडत असलेल्या खऱ्या गोष्टीला वाचा फोडण्याचे काम करत आहेत खऱ्या बातम्या लिहीत असताना स्थानिक पातळीवर अनेक राजकीय लोकांना राग येतो या रागाच्या भरात विविध राजकीय लोक संबंधित पत्रकारावर दबाव तंत्राचा वापर करतात धमक्या देतात त्यामुळे अशा पत्रकाराच्या पाठीमागे खंबीरपणे त्या त्या तालुक्यातील जिल्ह्यातील किंवा महाराष्ट्रातील पत्रकार संघटनांनी उभे राहण्याची गरज आहे तालुकास्तरावर किंवा ग्रामीण भागात पत्रकार बांधवांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे

जाहिरात

गावातील किंवा तालुक्यातील एखादी सत्य किंवा वस्तुनिष्ठ बातमी जर प्रकाशित केली तर त्या ठिकाणच्या लोकांकडून त्या पत्रकाराला धाकदपट करण्यात येतो अशा परिस्थितीत तो पत्रकार भविष्यात खऱ्या किंवा वस्तुनिष्ठ बातम्या लिहिण्याची हिंमत करत नाहीत त्यामुळे जर असा दबाव तंत्राचा वापर दिवसेंदिवस वाढत असेल तर मग खऱ्या बातम्या किंवा वस्तुनिष्ठ बातम्या कोण लिहिणार असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे महाराष्ट्र सरकारने पत्रकारांना संरक्षण मिळावे यासाठी पत्रकार संरक्षण कायदा सुरू केला आहे मात्र या कायद्याची निस्वार्थपणे व नियमानुसार कारवाई होताना कुठेही आढळून येत नाही ज्या ठिकाणी पत्रकारावर अन्याय होतो अशा ठिकाणी जर पत्रकार पोलीस विभागाकडे तक्रार करण्यास गेले तर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हे दाखल होत नाहीत उलट त्याच पत्रकारावर षडयंत्र करून उलट कारवाई करण्याच्या धमक्या देण्यात येतात त्यामुळे अनेक पत्रकार सध्या हतबल होत असल्याचे दिसून येत आहे अशा परिस्थितीत महाराष्ट्रामध्ये पत्रकारांसाठी ज्या संघटना काम करत आहेत त्या संघटनांनी पत्रकारांमध्ये जनजागृती करून पत्रकारांना धमक्या देणाऱ्या किंवा दबाव तंत्राचा वापर करणाऱ्या लोकांवर एक वचक निर्माण करावा जेणेकरून तालुकास्तरावर किंवा ग्रामीण भागातील पत्रकार बांधव कोणतीही भीती न बाळगता निस्वार्थपणे आपली सेवा सुरू ठेवतील व महाराष्ट्रामध्ये पत्रकारांचे एक चांगले संघटन निर्माण होईल यासाठी सर्व संघटनांनी कोणत्याही पत्रकाराच्या पाठीमागे मग तो पत्रकार साप्ताहिकाचा असो मासिकाचा असो पोर्टलचा असो युट्युबचा असो इलेक्ट्रॉनिक मीडियाचा असो किंवा प्रिंट मीडियाचा असो असा कुठलाही भेदभाव न करता सर्वांनी त्या सर्व पत्रकारांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले पाहिजेत तसेच सध्या मुंबईत सुरु असलेल्या विधीमंडळ अधिवेशनात याचा सर्वच लोकप्रतिनिधींनी आवाज उठवत पत्रकारांना निर्भयपणाने कामे करता यावी याकरीता यासाठी ठोस कायदे अमलात आणनेकामी प्रयत्न केला पाहिजे परंतु असे होताना दिसत नसल्याची मोठी शोकांतिका असल्याचे दिसून आहे असे या निमित्ताने सांगावेसे वाटते तूर्त एवढेच.
*- उद्धव श्रीराम फंगाळ*
समुह संपादक:
स्वाभिमानी प्रसार माध्यम समुह
प्रदेश उपाध्यक्ष:
स्वाभिमानी संपादक सेवा संघ (महा. प्रदेश)
मेहकर जि.बुलढाणा

लेख विशेष सहयोग
समाधान बोडखे – बुलढाणा
*संकलन*
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर – 956117411

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे