ब्रेकिंग

कोपरगावातील के.जे.सौमय्या व सदगुरु गंगागीर महाराज महाविद्यालयांना ; युवासेनेची भेट

कोपरगावातील के.जे.सौमय्या व सदगुरु गंगागीर महाराज महाविद्यालयांना ; युवासेनेची भेट

प्राचार्य व विद्यार्थी यांच्याशी संवाद साधून त्यांच्या समस्या व प्रश्न जाणून घेण्याचा प्रयत्न युवा सेनेकडून करण्यात आला

कोपरगाव : शहरातील के बी रोहमारे व के.जे.सोमैया महाविद्यालय तसेच एस. एस. जी. एम. अर्थात श्री सदगुरू गंगागीर महाराज या दोन्ही महाविद्यालयाला गुरूवारी गगन हाडा यांच्या समवेत युवासैनिक यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी युवा सेनेच्या वतीने सोमय्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर बी एस यादव गंगागीर महाराज महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर उज्वला भोर यांचा सत्कार केला यावेळी त्या ठिकाणी कार्यालयीन अधीक्षक सुनील गोसावी हजर होते या दोन्ही प्राचार्यांचा सत्कार करून त्यांच्याशी गगन हाडा यांनी विविध विषयांवर संवाद साधला.

जाहिरात

ग्रंथालयात पुस्तके उपलब्ध नसणे, वेळेची मर्यादा, शिक्षण व्यवस्थे बाबत विध्यार्थ्यांच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्या तक्रारीचे निराकरण करणे, अभ्यासक्रमाची पुस्तिका उपलब्ध करून द्यावे, ग्रंथालयाचा वेळ वाढवावा,विध्यार्थ्यांना पूर्वीप्रमाणे सुखसुविधा देण्यात याव्यात,.ग्रंथालया मध्ये चालू वर्षाचे तसेच नवीन अभ्यासक्रमाचे जी पुस्तके नाहीत ती तत्काळ उपलब्ध करून द्यावेत, बुक बँक ही योजना आपल्या कॉलेजमध्ये गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी सुरू ठेवावी, अशा अनेक बाबीवर गगन हाडा यांनी प्राचार्य यांचेबरोबर चर्चा करून माहिती जाणून घेतलीयावेळी गगन हाडा यांनी सन 2024 पंचवीस या वर्षात कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेल्या ग्रॅज्युएट व पोस्ट ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांची पटसंख्या याबाबत माहिती घेतली विद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार के. जे. सोमय्या कॉलेजमध्ये ग्रॅज्युएशन साठी २३३३ तर पोस्ट ग्रॅज्युएट साठी ६६६ असे एकूण २९९९ विद्यार्थी शिकत असल्याची माहिती मिळाली तर सद्गुरू गंगागिरी महाराज महाविद्यालयात ग्रॅज्युएशन साठी २३७४ विद्यार्थी तर पोस्ट ग्रॅज्युएट साठी ६६८ विद्यार्थी असे एकूण ३०४२ विद्यार्थी शिकत असल्याची माहिती दिली बी.ए, बी.कॉम, बी.एस.सी,त्यापुढील एम ए इकॉनोमिक, इंग्रजी, हिंदी, हिस्टरी, पॉलिटिक,मराठी ए. कॉम, . ॲडव्हान्स अकाउंटंट बिझनेस ऍडमिनिस्ट्रेश, एम. एस. सी. बॉटनी, केमिस्ट्री, कम्प्युटर सायन्स, मॅथ, मायक्रो फिजिक्स, पीएचडी. हिंदी, जॉग्रोफी, पॉलिटिक, केमिस्ट्री, फिजिक्स, झूलॉजी या अभ्यासक्रमाची पुस्तके देखील लायब्ररीमध्ये उपलब्ध करून द्यावेत.

अशा काही बाबींची चर्चा गगन हाडा यांनी केली काही विद्यार्थी-विद्यार्थिनीशी संवाद साधून त्यांच्याही समस्या त्यांनी जाणून घेतल्या यावेळी निखिल कंक्राळे, कान्हा हाडा, प्रतीक मोरे, विनायक टाक, गौतम निंदाने, वैभव शेलार, चेतन हाडा, अतुल बारहाते, रितेश वाघिले, रोहान शेख, साहिल पटवेकर जीवन बारहाते, गणेश भसाळे, साहिल पठाण, आदी युवा सैनिक उपस्थित होते

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे