महाराष्ट्र

हद्दवाढ झालेल्या भागातील  कामे त्वरित सुरू करावे:- निसार शेख

हद्दवाढ झालेल्या भागातील  कामे त्वरित सुरू करावे:- निसार शेख

कोपरगाव शहरातील नव्याने हद वाढ झालेल्या भागातील कामे व्हावी या साठी गेल्या अनेक वर्षांपासून  सामाजिक कार्यकर्ता या नात्याने निसार शेख यांचा पाठपुरावा सुरू होता,  त्या पाठपुराव्याची दखल घेत 10 कोटी रुपयांचे निधी मंजूर झाले असून तरीही कामे मात्र प्रत्यक्षात सुरू नाही व ती प्रत्यक्षात सुरु व्हावी या सामाजिक कार्यकर्ते  निसार शेख यांनी दिनाक 30/10/2023 रोजी  नगरपालिके समोर आमरण उपोषणास बसले होते, यावेळी रात्री उशिराने उपमुख्याधिकारी व त्यांचे सर्व सहकारी यांनी भेट घेतली त्या प्रसंगी मनसे चे संतोष  गंगवाल, शेतकरी कृती समितीचे तुषार विध्वंस, लोकस्वराज्य आंदोलनाचे ए्ँड नितीन पोळ, लहुजी सेनेचे फकिरा चंदनशिव व अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी मध्यस्थी केली. तसेच कोपरगाव नगरपालिकेने मला लेखी आश्वासन दिले की तुम्ही तुमचे आमरण उपोषण सोडवा आम्ही तुमच्या भागातील काम दोन तीन महिन्यात सुरू करून देतो आमच्या नवीन हद्द‌वाढ झालेल्या भागातील दोन तीन कामे सोडली तर बाकी सर्व कामे अजून देखील सुरू झाली नाही, रखडली आहे तसेच निकृष्ट रस्त्याची चौकशी करा ही कामे लवकर सुरू झाली नाही तर पुन्हा आमरण उपोषण सुरु करणार असे लेखी निवेदन भुमीपुत्र फांऊडेशनच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते निसार शेख यांनी १७ जुलै २०२४ रोजी नगरपालिकेला दिले आहे.

जाहिरात
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे