महाराष्ट्र

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती लोकशाहीर आण्णाभाऊ साठे मालवाहतूक चालक-मालक असोशियन यांच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती लोकशाहीर आण्णाभाऊ साठे मालवाहतूक चालक-मालक असोशियन यांच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी

संपादक:- रवींद्र जगताप

कोपरगाव प्रतिनिधी :-  कोपरगाव शहरातील लोकशाहिर अण्णाभाऊ साठे चालक-मालक असोसिएशन यांच्या वतीने मोठ्या थाटामाटात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली आहे. या असोसिएशनच्या वतीने नेहमी सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असतात .मातंग समाजातील युवा नेतृत्व संदीप निरभवणे हे अनेक वर्षांपासून सामाजिक कामकाज करत आहेत. 

जाहिरात

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी कष्टकरी गरीब समाजाच्या व्यथा आपल्या लेखणीतून मांडल्या आहे . गरिबीतून जीवन कसे जगावे हे अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातून आपल्याला कळते याचा आदर्श घेऊन संदीप निरभवणे यांनी सर्व जाती धर्मातील तरुणांना एकत्र करून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चालक-मालक असोशियन निर्माण करून अनेक तरुणांना रोजगार त्यांनी मिळवून दिला आहे असे हे संदीप निरभवणे यांनी सर्व समाजातील तरुणांना एकत्र आणत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती धुमधडाक्यात साजरी केली आहे.दरवर्षी ते नेहमी आगळावेगळा उपक्रम राबवून वेगवेगळे सामाजिक कामकाज ते करत असतात. याप्रसंगी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिन दादा कोल्हे यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले होते .या कार्यक्रमासाठी लोकशाहिर अण्णाभाऊ साठे मालवाहतूक चालक मालक असोसिएशन कोपरगाव संस्थापक अध्यक्ष संदीप निरभवणे ,सचिन त्रिभुवन तुकाराम निरभवणे,अभय हलवाई ,विशाल निरभवणे, शरद निरभवणे सलिम पठाण राहुल कासारे अमोल मोरे साई लांडगे गोकुळ बिडवे जतिन निरभवणे सार्थक निरभवणे प्रकाश निरभवणे साई निरभवणे बाबासाहेब बिडवे संजय खंडागळे जय खंडागळे नितीन सोळसे संदीप आहेर अर्जुन कुशवाहा सागर अस्थाना आदी सर्व लोकशाहिर अण्णाभाऊ साठे मालवाहतूक चालक मालक असोसिएशनचे पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे