ब्रेकिंग

पुणतांबा गावात बैलपोळा मोठ्या उत्साहात साजरा.

पुणतांबा गावात बैलपोळा मोठ्या उत्साहात साजरा.

पुणतांबा गाव दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते.तसेच विक्रमादित्य राजा सह .चौदाव्या जिवंत समाधीस्थ योगीराज चांगदेव महाराज. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर.संत गंगागिरी महाराज..संत जनार्दन स्वामी महाराज.यांच्या पावन स्पर्शाने .ऐतिहासिक वारसा लाभलेले.गावात पवित्र गंगा गोदावरी नदीच्या किनारी अनेक साधुन संत .महत्मे यांचे वास्तव्य होऊन पुणीत झालेले गाव.या गावात सामाजिक. धार्मिक कार्यक्रमाची बाराही महिने उत्सवांची रेलचेल असते. पुणतांबा गावात संपूर्ण महाराष्ट्रातुन भाविक. वारकरी संप्रदाय भक्त . महिला माता भगिनी मोठ्या संख्येने गंगा गोदावरी नदीच्या पात्रात स्नान करण्यासाठी उपस्थितत राहात असतात.पुणतांबा गावात शेतकरी बांधवांची संख्या मोठी असुन.शेतकरी बांधवांच्या घरोघरी शेती कामा साठी बैलांची संख्या मोठी होती .या साठी गावातील चारशे ते पाचशे बैलांची यादिवशी सायंकाळी सहा वाजता एकत्रीत वाजत गाजत .फटाकेच्या आतषबाजी ने मिरवणूक काढुण परीसरातील सर्व शेतकरी बांधव बैलपोळा मोठ्या उत्साहात साजरा करण्याची पंरपरे नुसार पध्दत होती.

 

या काळात या उपक्रमात उत्साहात माजी खासदार कै सुर्यभान वहाडणे पा.कै.माजी आमदार कै बाराहाते पा .माजी आमदार कै बाबुराव चतुर्भुज. भास्करराव जाधव.कै निवृत्ती पा धनवटे .कै अप्पासाहेब धनवटे.कै अर्जुन पा वहाडणे.कै वसंतराव वहाडणे. कै सावित्रीभाऊ थोरात.कै शरदराव जोशी. कै रामभाऊ शेरकर.कै रामभाऊ लुपांटकी. व आमचे आजोबा कै दामोदर कुलकर्णी .कै वासुदेव कुलकर्णी. वडील कै दिंगबर कुलकर्णी.चुलते कै बाळासाहेब कुलकर्णी.कै देविदास कुलकर्णी. श्री जनार्दन पा वहाडणे. श्री मुरलीधर थोरात.यांचे सह मोठे दिग्गज राजकीय.सामाजिक नेते गावचे नेतृत्व करत होते.तसेच गाव व परीसरातील शेतकरी बांधव आप आपले बैलांची जोडी सजवुन बैलासह गावाबाहेरील अहिल्यादेवी घाट . हनुमान मंदिराचे दर्शनासाठी येथे मोठ्या एकोप्याने जिवाभावाने.एकत्र येत होते.

जाहिरात

.यात कुलकर्णी परीवाराचे बैलजोडी साधारण 16 बैलजोड्या ह्या बघण्यासाठी पुणतांबा करासाठी आकर्षण ठरत होत्या.शिंगाला भगवे हिंगुळ.लाईटींग चे बाशिंग. गळ्यात पितळी तोडे अंगावर महागड्या शाली. घोगळ. घंटी .एक आकर्षण होते. कुलकर्णी चे बैलांची जोडी सजवलेली बघण्यासाठी पुणतांबा येथील कहार समाज व बाजारपेठेतील अबाल वृध्द.तरुण. तरुणी. महिला माता भगिनी.बालशिशु.मोठ्या संख्येने उपस्थित राहात होते. पंरतु काळाचे बदलत्या आधुनिक जमान्यात बैल जोडी ची जागा शेतकरी बांधवांचे घरी शेती कामासाठी ट्रॅक्टर नी जागा घेतल्या मुळे गावातील बैलपोळा मिरवनुक गेल्या पाच पंचवीस वर्षापासुन बंद झाली होती यावर्षीचा बैलपोळा गावातील प्रगतीशील शेतकरी. होतकरू सामाजिक धडाडीचे युवक कार्यकर्ते. आमचे जिवलग मित्र. बांधभाऊ डोखे पा परीवाराचे वतीने यांनी प्रथमच आपले बैलांची मिरवणूक आज स्वखर्चाने वाजत गाजत.फटाकेच्या आतषबाजीने कोपरगाव रोड.जय मल्हार चौकातुन सुरुवात केली असता.बैलपोळा मिरवणूक बंद झालेल्या परंपरेला छेद देऊन मोठ्या उत्साहात मिरवणूक काढली या मिरवणुकीत शेतकरी बांधव आप आपली बैलजोडी.घोडे. गाय सजवुन मिरवणुकीत सहभागी झाले असता.पुणतांबा शिवसेना शहरप्रमुख महेश कुलकर्णी यांनी युवक कार्यकर्ते दिपक डोखे यांचे स्वागत केले.कोपरगाव रस्त्याने महात्मा फुले मार्केट चे व्यावसायिक बंधु. वास्तव्य करत असलेले .वडार समाज होल्डरवाडी.विक्रम चौक आशा केंद्र चौकातील व इतर सर्व धर्मिय अनेक सुहासिनी माता. भगिनी. युवतींनी बैलजोड्यांचे पाय धुऊन .औक्षण करत. पुरन पोळीच्या नैविद्यासह कडधान्य देऊन मोठ्या संख्येने उत्साहात पुजन करण्याचा आनंद लुटला असता.काही जुन्या पिढीतील माता भगिनी यांनी सांगितले की आम्ही आजपर्यंत घरामध्ये परंपरेनुसार मातीच्या बैलजोडीची पुजा करत आहे. आजचा आनंदाचा क्षण आपले शेतकरी बंधु दिपक डोखे यांच्या माध्यमातून नव्यापिढीतील सुहासिनींना पुजन करण्याचे भाग्य लाभले.त्यानिमित्ताने डोखे पा परीवाराचे आभार मानुन.या उपक्रमाचे कौतुक केले.याप्रसंगी . पुणतांबा शिवसेना शहरप्रमुख महेश कुलकर्णी. सामाजिक कार्यकर्ते सचिन धनवटे.रमेश पवार.बाळासाहेब पवार.साहेबराव पवार. यूगांत डोखे.प्रविण डोखे ‌.सुरेश डोखे.कैलास डोखे.आबासाहेब डोखे.त्र्यंबक डोखे.चंद्रकांत डोखे.देविदास डोखे.अॅड अशोकराव डोखे परीवार यांचे सह असंख्य नागरिक बंधु भगिनी.माता .युवक.युवती मोठ्या संख्येने हजर होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे