ब्रेकिंग

कोपरगांव तालुका शालेय खो खो स्पर्धा उत्साहात संपन्न

कोपरगांव तालुका शालेय खो खो स्पर्धा उत्साहात संपन्न

संपादक:- रवींद्र जगताप

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे. जिल्हा क्रीडा अधिकारी, अ. नगर व कोपरगांव तालुका क्रीडा समिती आणि सोमय्या विद्या मंदीर,साकरवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुका स्तरीय खो खो स्पर्धा दिनांक ३० ऑगस्ट व ३१ ऑगस्ट रोजी पार पडल्या.. सदर स्पर्धेचे उद्घाटन सोमय्या विद्या विहार चे जनरल मॅनेजर श्री. सुहास गोडगे साहेब,शाळेच्या मुख्याध्यापीका, डॉ. पारे मॅडम, क्रीडा समिती अध्यक्ष नितीन निकम सर, सचिव अनुप गिरमे सर, मान्यवर, राज्य पंच रविंद्र नेन्द्रे, अण्णा गोपाळ,सहभागी विविध शाळेतील क्रीडा शिक्षक, मार्गदर्शक व जवळ जवळ २५० विदयार्थी,विद्यार्थीनी उपस्थित होते.. यावेळी सोमय्या विद्या मंदीर शाळेच्या संगीत चमूने स्वागत गीत सादर करुन सर्वांना मंत्र मुग्ध केले.. या वेळी मुख्य अतिथी सुहास गोडगे साहेब यांनी सर्व खेळाडूना शुभेच्छा दिल्या..मुख्याध्यापिका पारे मॅडम यांनी आपल्या भाषणात खेळाचे महत्त्व किती आहे हे सांगितले. या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन, नियोजन सोमय्या विद्या मंदीर शाळेचे क्रीडा मार्गदर्शक व समिति उपाध्यक्ष संजय अमोलिक यांनी उत्कृष्ट केले होते.

जाहिरात
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे