राजकिय
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाच्या कोपरगाव तालुकाध्यक्ष पदी बाबासाहेब भारुड
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाच्या कोपरगाव तालुकाध्यक्ष पदी बाबासाहेब भारुड
कोपरगाव प्रतिनिधी :-राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाच्या कोपरगाव तालुकाध्यक्ष पदी संवत्सर येथील सामाजिक कार्यकर्ते व ‘बार्टी’ कृतिसमितीचे राज्य पदाधिकारी बाबासाहेब भारूड यांना नियुक्ती करण्यात आली आहे.या नियुक्तीचे पत्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश पवक्ते व अ’नगर जिल्हा कार्याध्यक्ष ऍड. संदीपजी वर्पे,राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाचे अ’नगर जिल्हाध्यक्ष अभिजित ससाणे सामाजिक न्याय शहराध्यक्ष गौतम बनसोडे यांच्या हस्ते देण्यात आले आहे.याप्रसंगी,संतोषजी वढणे कोपरगाव युवक शहराध्यक्ष स्वप्नील पवार, कोपरगाव सोशल मीडिया प्रमुख ऋतुराज काळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते



