सामाजिक

एस.एस.जी.एम. मध्ये ‘ आदरणीय पद्मभूषण मान. खासदार श्री. शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या ८२ व्या वाढदिवसानिमित्त ‘ कृतज्ञता सप्ताहाचे’ आयोजन-

एस.एस.जी.एम. मध्ये ‘ आदरणीय पद्मभूषण मान. खासदार श्री. शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या ८२ व्या वाढदिवसानिमित्त ‘ कृतज्ञता सप्ताहाचे’ आयोजन

कोपरगाव-येथील एस.एस.जी.एम. महाविद्यालयामध्ये रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, आदरणीय पद्मभूषण मान. खासदार श्री शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या ८२ व्या वाढदिवसानिमित्त ‘कृतज्ञता सप्ताहाचे’ आयोजन करण्यात आलेले आहे. ०६ डिसेंबर २०२२ ते १२ डिसेंबर २०२२ या कालावधीत संपन्न होणाऱ्या या कृतज्ञता सप्ताहात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्यात निबंध स्पर्धा, आरोग्य व स्वच्छता, माता -पालक मेळावा, वृक्षारोपण, रांगोळी-चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, क्रीडा स्पर्धा,व्याख्यान इ. कार्यक्रम घेण्यात येणार असून विविध कार्यक्रमांनी भरगच्च असा हा ‘कृतज्ञता सप्ताह’ संपन्न होणार आहे.
दि. १२ डिसेंबर २०२२ रोजी होणाऱ्या समारोपपर व्याख्यान कार्यक्रमासाठी मा. श्री भास्करराव पेरे पाटील,माजी आदर्श सरपंच- पाटोदा हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून,या कार्यक्रमाचे अध्यक्षपद रयत शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन व महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन मा. ॲड. भगीरथ शिंदे हे भूषविणार आहेत.सदर कार्यक्रमासाठी मान. आमदार आशुतोष काळे,सदस्य,महाराष्ट्र विधानसभा,अध्यक्ष उत्तर विभाग रयत शिक्षण संस्था, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य मा.श्री. अशोकराव काळे,मा. श्री. बिपिनदादा कोल्हे, मा. श्री संदीप वर्पे, मा. श्री. पद्मकांत कुदळे, मा. श्री. कारभारी आगवन, मा.श्री. मच्छिंद्र रोहमारे, मा. श्री. बाळासाहेब कदम, मा. श्री. अरुण चंद्रे ; तसेच महाविद्यालय विकास समितीचे सदस्य मा. श्री विवेक कोल्हे, मा. सौ.चैतालीताई काळे, मा. श्री. सुनील गंगुले इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी या कार्यक्रमाचा लाभ परिसरातील नागरिक व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने घ्यावा, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रमेश सानप यांनी केले आहे.

जाहिरात
जाहिरात
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे