आरोग्य व शिक्षण

सोमैया महाविद्यालयात सॉफ्टवेयर डेवलपमेंट या विषयावर अंतरराष्ट्रीय व्याख्यानाचे  आयोजन

सोमैया महाविद्यालयात सॉफ्टवेयर डेवलपमेंट या विषयावर अंतरराष्ट्रीय व्याख्यानाचे  आयोजन

कोपरगाव: येथील के. जे. सोमैया महाविद्यालयात परप्युचल हेल्प सिस्टम डाल्टा विद्यापिठ, फिलीपाईन्स च्या स्कूल ऑफ़ कॉम्पुटर स्टडीजचे डिन प्रा. पास्टर आरग्यूलस ज्यू. यांचे सॉफ्टवेयर डेवलपमेंट प्रोसेस व क्वालिटी कण्ट्रोल या विषयावर हायब्रिड पद्धतीने अंतरराष्ट्रीय व्याख्यानाचे  आयोजन करण्यात आले. संगणक शास्त्र विभाग व बी.बी.ए. सी.ए. या विभागाच्या वतीने अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या च्या अंतर्गत परप्युचल हेल्प सिस्टम डाल्टा विद्यापिठ, फिलीपाईन्स बरोबर झालेल्या सांमज्यस्य कराराच्या अंतर्गत आयोजित या व्याख्यानात डिन प्रा. पास्टर आरग्यूलस ज्यू. यांनी सॉफ्टवेयर डेवलपमेंट या विषयावर बोलताना सांगितले कि, सॉफ्टवेअर डेवलपमेंट या क्षेत्रात विद्यार्थ्यांना करियरच्या असंख्य संधी आहेत मात्र त्यासाठी आवश्यक कौशल्य आत्मसात केली पाहिजेत हे सांगताना त्यांनी सॉफ्टवेयर डेवलपमेंट प्रोसेस, सॉफ्टवेयर डेवलपमेंट ऐक्टिविटीज, विविध मॉडेल, सॉफ्टवेयर डेवलपमेंट पद्धती, आय.एस. ओ. 25010,:2011, प्रोडक्ट क्वालिटीची वैशिष्टे, सी.एम.एम.आय. क्वालिटी चौकट व त्याचे विविध स्तर, प्रक्रिया सांगताना सॉफ्टवेयर डेवलपमेंट मधिल नविन ट्रेंड यावर सविस्तर विवेचन करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली. महविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एस. यादव यांनी महविद्यालयाच्या वतीने अतिथींचे स्वागत करून परप्युचल विद्यापिठ, फिलीपाईन्स बरोबर महाविद्यलयाचा झालेल्या सांमज्यस्य कराराची सुरुवात आजच्या कार्यक्रमापासुन झाली असुन याचा विद्यार्थी, शिक्षक व महाविद्यालय यांना फायदा होणार आहे व ग्रामीण भागातील विद्यापीठ ग्लोबल शैक्षणिक वातावरणाकडे वाटचाल करत आहे असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात या कार्यक्रमाचे व सांमज्यस्य कराराचे समन्वयक डॉ. रविंद्र जाधव यांनी अतिथिंचा परिचय करून दिला व कार्यक्रमाची रुपरेषा विशद करताना परप्युचल हेल्प सिस्टम डाल्टा विद्यापिठ, फिलीपाईन्स बरोबर झालेल्या सांमज्यस्य कराराचा एक भाग म्हणून आजचे व्याख्यान आयोजित केले व कराराअंतर्गत असे अनेक शैक्षणिक उपक्रम आयोजित करणार असल्याचे सांगितले.याप्रसंगी संगणक शास्त्रं विभागाचे प्रमुख डॉ. आर. के. कोल्हे, प्रा. प्रविण गुढघे, प्रा. सचिन जाधव, प्रा. कोते, प्रा. कोळपकर, प्रा. घोलप, प्रा. चांदगुडे, प्रा. पोखरकर, प्रा. जपे, प्रा. डांगे इ. प्राध्यापक उपस्थीत राहून यशस्वी आयोजनात महत्वाची भुमिका पार पाडली. या प्रसंगी सुमारे 150 विद्यार्थी ऑफ़लाईन तसेच ऑनलाइन पद्धतीने उपस्थीत राहून व्याख्यानाच्या शेवटी प्रश्नउत्तराच्या कार्यक्रमात भाग घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  डॉ. रविंद्र जाधव यांनी तर आभार प्रा. अभिजित कवने यांनी केले.महविद्यालय राबवित असलेल्या  अंतरराष्ट्रीय नावीन्यपूर्ण उपक्रमाचे कौतुक कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटी चे अध्यक्ष श्री. अशोकराव रोहमारे, सचिव ॲड. संजीव दादा कुलकर्णी व संचालक श्री. संदीप रोहमारे यांनी केले व भावी उपक्रमास शुभेच्छा दिल्या.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे