कोपरगाव येथील शुभम शिंदे यांचा राष्ट्रवादी शरद पवार गटात पक्ष प्रवेश
कोपरगाव येथील शुभम शिंदे यांचा राष्ट्रवादी शरद पवार गटात पक्ष प्रवेश
महाराष्ट्र राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीचा जोर वाढला आहे अनेक पक्ष आणि पक्षाचे कार्यकर्ते विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत व्यस्त आहे राज्यात अनेक ठिकाणी राजकीय उलथापालथ देखील पहावयास मिळत आहे अहमदनगर जिल्ह्यात कोपरगाव तालुक्यात देखील विधानसभा निवडणुकीची जोरदार चर्चा चालू आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदपवार गटाचे कोपरगाव विधानसभा मतदारसंघात जोरदार मोर्चे बांधणी देखील चालू आहे. कोपरगाव शहरातील शुभम शिंदे या युवकाचे कोपरगाव शहरात मोठे सामाजिक काम आहे आंबेडकरी चळवळीत देखील त्यांनी मोठे कामकाज केले आहे

नुकतेच संदीप.वर्पे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष गौतमराव बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली शुभम साहेबराव शिंदे यांनी प्रवेश करत तुतारी हाती धरली आहे व त्यांनी पक्ष प्रवेश करतात त्यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार )पक्ष सामाजिक न्याय विभागाच्या कोपरगाव शहर उपाध्यक्ष पदाची जबाबदारी माननीय संदीपराव वरपे यांनी टाकली आहे प्रसंगी सलमान पठाण आसिफ शेख यास असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते
संपादक रवींद्र जगताप
संपादक रवींद्र जगताप

