ब्रेकिंगसामाजिक

महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या नगरपालिकेंच्या स्वच्छ सर्वेक्षण गाव अभियानात ,कोपरगाव नगरपालिका कधी अव्वल , १ नंबर चे बक्षीस मिळवणार ?:-.माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील

कोपरगाव प्रतिनिधी :-         स्वच्छता ठेवा , करा अशी शिकवण देणारे संतश्री. गाडगेबाबा यांचे नावाने महाराष्ट्र शासनाने नगरपालिके साठी पूर्वी सुरू केलेले स्वच्छता अभियानात बक्षिसे दिले जातात. या साठी स्पर्धेत भाग घ्यावाच लागतो. या सर्वेक्षणात भाग घेतांना 1,2 महिने काळजीने केले जाते , गाव बोर्ड लावून रंगवले जाते , मोठा खर्च केला जातो , शासनाचे अधिकारी टीम ऐवुन गेली की परत १० महिने जसे जमेल तशी स्वच्छता. आयुक्त साहेब आले होते २ महिन्यापूर्वी यावेळी सर्वे नगरपालिकेला रंग रंगोटी केली , साफ सफाई केली , रांगोळ्या काढल्या , आयुक्त साहेब  व कलेक्टर साहेब यांना खुश केले . पण खऱ्या अर्थाने गाव तसेच अस्वच्छ , संत.गाडगेबाबा नी सांगितल्या प्रमाणे प्रत्येक मानवात देव बघावा असे नगरपालिका कधी वागणार ,  अधिकारी आले की स्वच्छता , रंगरंगोटी , मग गावातील जनता काय जनावर आहे का ? नुसते बक्षीसा साठी, थोडा वेळ तातपूर्त काम न करता , कोपरगाव धूळ मुक्त , कचरा मुक्त , गोदावरी नदीला प्रत्येक घरातून जाणारे सांडपाणी , मैला , कत्तल होऊन जाणारे रक्त , यावर स्वेज  ट्रीटमेंट प्लांट बसवून यातून कायमचे गाव व गोदावरी नदी स्वच्छ ठेवण्या साठी सतत प्रयत्न करून कोपरगाव हे महाराष्ट्रातील १ एक नंबर चे आदर्श स्वच्छ गाव करून , नुसते २ महिने स्वछ न ठेवता , वर्ष भर स्वच्छ ठेवावे व महाराष्ट्रात कोपरगाव चे नाव लवकीक वाढवावे. सध्या गावात सर्वी कडे पांढऱ्या रांगोळ्या दिसत आहे , असे न करता, नेहमीच पावडर टाकून , दर महिन्याला, किंवा 15 दिवसाला, डासांच्या साठी पॉवर फुल औषध फवारणी करावी , जेणेकरून रोगराई वाढणार नाही , मोकळ्या व मोकाट जनावरांचा प्रश्न कायम स्वरूपी मोठ्या शहारांप्रमाणे मार्गी लावावा .तसेच मनईतील कचरा विभागणीचा , प्लांट नेहमी करिता चालू करावा व चालू ठेवावा.आरोग्य अधिकारी  व सर्वे आरोग्य मुकादम , स्टाफ , सफाई पुरुष व महिला कर्मचारी  यांनी कोरोना काळात खूप चांगले काम शहरासाठी , जनतेसाठी केले. या साठी त्यांचे आभार.

आरोग्य विभागातील स्थनिक कर्मचारी चांगले काम करत आहे ,  आत्ता गावासाठी कर्मचारी कमी पडत आहे , या साठी पालिकेने स्वच्छतेचा ठेका दिला आहे .प्रत्येक घरातून कचरा घेवुन जायचे ही त्यात आहे , गेले अनेक वर्ष असे करताना दिसत नाही , रोज गटारी साफ करायच्या ते ही दिसत नाही ,  अंडर ग्राउंड ड्रेनेजच्या पाईपलाईन झाल्या , त्या मुळे खर्च कमी झाला  , परत याचा व कोपरगाव वाढीचा विचार करून फेर टेंडर काढावे. पालिकेचा जनतेचा पैसा वाचेल , टेंडर चे डिटेल जनतेला , पँम्पलेट , माहिती पत्रक वाटून , प्रत्येक घरात याची माहिती द्यावी. मोठे फ्लेक्स बोर्ड टेंडर चे आरोग्य ठेक्याचे लावावे , म्हणजे जनतेला कळेल की ठेक्यात काय दिले आहे.कर रूपाने जनता पैसे भरती, त्याचा हिशोब मागण्याचा अधिकार जनतेला आहे. किती लोक ठेक्यात आहेत , घंटागाडी वेळेवर येईल. गावातील काट्या उगवल्या असतील ते प्लॉट नगरपालिकेने साफ करावे.जेणेकरून डास वाढणार नाही , माशांच्या अटकाव करावा. कोपरगाव शहराचे उपनगरे वाढले आहेत ,हद्द वाढ झाली ,त्यांचा शहरात समावेश झाला आहे . वॉर्ड वाढले , लोकसंख्या वाढली यांचा विचार करून त्यांनाही शहराच्या नागरिकांसारख्या सुविधा मिळाव्यात. या साठी ठेकेदाराला ठेक्याच्या असलेल्या नॉम्स प्रमाणे कामगार वाढवायला लावले पाहिजे. नवीन रस्त्याचे कामे चालू आहेत , हे रस्ते किती दर्जेदार झाली ? गुणवत्ता किती दिवस, महिने , वर्ष टिकतील ? हे येणारा पावसाळा ,काळच सांगूं शकेल , रस्ते साफ करण्यासाठी मशिनरी आहेत , त्यांचा उपयोग नवीन रस्त्याना करावा .त्या मुळे जीवघेण्या  धुळी पासून जनतेला सुटकारा मिळेल.या अभियानात सरकारने लाखो रुपयांचे बक्षीस ठेवले आहे , त्या रकमेचा उपयोग ही ,स्वच्छ ते साठी वापरता येतो व या मुळे नागरपालिके चे पैश्याची , म्हणजेच नागरिकांच्या पैश्याची बचत होऊन आरोग्यासाठी हितकारी होते, गावाचे नावलौकिक वाढते.वर्ष भर जनतेला स्वच्छता मिळेल , जी वर्षानुवर्षे मिळाली नाही या मुळे नागरिकांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल. आणि हा जनतेचा हक्क आहे , नागरिक भरणार्या करातून च हे केले जाते .निश्चित जनतेच्या मनातील हवी असणारी स्वच्छता , शहारांप्रमाणे , नगरपालिकेने ठरवले तर 100% होऊ शकते आणि तसे पालिकेने करून दाखवून द्यावे व गावाचे नाव पाहिले बक्षीस नेहमी करीत मिळवत जाऊन व शहरातील नागरिकांना ही धुळी , घाणी  , डासांपासून कायमस्वरूपी स्वच्छता ठेवत जाऊन या बाबतीतला आनंद, सुटकार मिळवून दयावा असे दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात मा.नगराध्यक्ष मंगेश पाटील म्हणाले आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे