राजकिय

विकासाच्या प्रश्नावरून लक्ष हटविण्यासाठी केंद्र सरकारचे दडपशाहीचे राजकारण :- ना. आशुतोष काळे

अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेचा कोपरगावात महाविकास आघाडीकडून निषेध

 

अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांन अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) केलेल्या अटकेच्या निषेधार्थ आंदोलन करतांना ना.आशुतोष काळे समवेत कोपरगाव महाविकास आघाडीचे कार्यकर्ते.

  • संपादक :- रवींद्र जगताप

कोपरगाव प्रतिनिधी :-    विकासाच्या बाबतीत केंद्र सरकार अपयशी ठरले आहे. नोटबंदी व जीएसटी कर प्रणालीमुळे अनेक उद्योगधंदे बुडाले असून अनेकांच्या हातचे रोजगार कायमचे हिरावले आहे.बेरोजगारांच्या हाताला काम नाही. लॉक डाऊनमुळे शेतकरी, कष्टकरी, व्यापारी, छोटे-मोठ्या व्यावसायिकांसह सर्वसामान्य नागरिक अडचणीत असून महागाई गगनाला भिडली आहे. याकडे केंद्र सरकारने लक्ष देवून सर्वसामान्य जनतेला दिलासा देणे गरजेचे आहे. मात्र या प्रश्नावरून लक्ष हटविण्यासाठी केंद्र सरकार दडपशाहीचे राजकारण करीत असून अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना अंमलबजावणी संचालनालयाने केलेली अटक केंद्र सरकारची दडपशाही असल्याची टीका श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना.आशुतोष काळे यांनी कोपरगाव येथे केली आहे.  राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नवाब मलिक हे सातत्याने केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणावर लोकशाही पद्धतीने जाहीरपणे बोलत असल्यामुळे केंद्र सरकारने राजकीय सुडापोटी) केंद्रीय तपास यंत्रणा ईडी(अंमलबजावणी संचालनालय) चा वापर करून अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना अटक केली आहे. त्या अटकेच्या निषेधार्थ शुक्रवार (दि.२५) रोजी  कोपरगाव शहर व तालुका महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी स्मारक येथे ना. आशुतोष काळे यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार व केंद्रीय तपास यंत्रणांचा निषेध करण्यात आला.याप्रसंगी ना.आशुतोष काळे बोलत होते. पुढे बोलतांना ते म्हणाले की, केंद्र सरकार विकासाच्या मुद्द्याकडे दुर्लक्ष करून दडपशाही करीत आहे. केंद्र सरकारला धडा शिकविण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवावे लागणार असल्याचे ना.आशुतोष काळे यांनी सांगितले. यावेळी नायब तहसीलदार श्रीमती मनिषा कुलकर्णी यांना कोपरगाव शहर व तालुका महाविकास आघाडीच्या वतीने ना.आशुतोष काळे यांनी निवेदन दिले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पेतालुकाध्यक्ष माधवराव खिलारीराष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनील साळुंकेराष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगरशिवसेना शहराध्यक्ष कलविंदरसिंग डडियालराष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नवाज कुरेशीराष्ट्रीय युवकचे जिल्हा उपाध्यक्ष तुषार पोटेमहिला शहराध्यक्षा सौ. प्रतिभा शिलेदारयुवती तालुकाध्यक्षा सौ. वैशाली आभाळे,महिला जिल्हा सरचिटणीस सौ. रेखा जगतापविद्यार्थी तालुकाध्यक्ष निखिल डांगेविद्यार्थी शहराध्यक्ष कार्तिक सरदारमनसेचे सुनील फंडकर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोमसंचालक विठ्ठलराव आसनेआनंद चव्हाणमहात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमचंद बागरेचा,नगरसेवक गटनेते विरेन बोरावकेमंदार पहाडेहाजी मेहमूद सय्यदराजेंद्र वाकचौरेअजीज शेखगौतम बँकेचे संचालक सुनील शिलेदाररमेश गवळीफकीर कुरेशीसौ. मायादेवी खरेचंद्रशेखर म्हस्केराहुल देवळालीकरसुनील मोकळरावसाहेब साठेजावेद शेखप्रफुल्ल शिंगाडेकेशव जावळेकौसर सय्यद,भाऊसाहेब भाबडबाळासाहेब रुईकरअंबादास वडांगळेराजेंद्र खैरनारअशोक आव्हाटेवाल्मिक लहिरेसंदीप कपिलेधनंजय कहारनितीन शिंदे,इम्तियाज अत्तारआकाश डागामहेश लोंढेदिपक रोहोमसंकेत कडवेप्रसाद उदावंतविकी जोशीराजेंद्र आभाळेमनोज कडूमनोज नरोडेविकास बेंद्रेकिशोर डोखेस्वप्नील सोनवणेसागर लकारेएकनाथ गंगूले,राजेंद्र जोशीतेजस साबळेमहेश उदावंतसंतोष शेलार,भाग्यश्री बोरुडेशितल लोंढेकविता जिरेसौ. रुपाली कळसकरमिरा साळवेसुषमा पांडेशितल वायखिंडे,दिनेश संतशंकर घोडेरावफयाज शेखराकेश शहा,राजेंद्र पठाणगणेश बोरुडेमनोज शिंदेयासीर अत्तार,अक्षय दहेमन्सालाल दहेबाबासाहेब होननारायण लांडगेचंद्रहार जगतापइरफान शेखराहुल देशपांडे,वैभव गितेसुनील कुंढारेसागर सोमवंशीबाबुराव पवारलक्ष्मण फुलकरविजय जाधवयोगेश जावळे,स्वप्नील शिंदेशुभम शिंदे,प्रसाद रुईकरजब्बार मन्सूरी,रविंद्र राऊतज्ञानेश्वर भगतकिरण बागुलऋतुराज काळेरितेश राऊतसंतोष बारसेतुकाराम चव्हाण,राजेंद्र ठाकरेरोशन शेजवळअक्रम शेखचंद्रकांत धोत्रे,शफीक शेखयोगेश वाणीरोहित खडांगळेराहुल राठोडसोमेश शिंदेप्रतीक रुईकरप्रदीप मतेअर्जुन डूबेअमोल गिरमेप्रदीप कुऱ्हाडेरवींद्र देवरेअभिषेक कोकाटेजनार्दन शिंदेलवेश शेलारविजय शिंदे आदींसह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

               

 

 

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे