सामाजिक

इंदिरापथ , के.जे.सोमैया कॉलेज व पंचायत समिती पुढच्या रोड नगरपालिका प्रशासक कधी करणार ?:-माजी नगराध्यक्ष. मंगेश पाटील

संपादक :- रवींद्र जगताप

कोपरगाव :- कोपरगाव शहरातील जास्त दळणवळणाचा संभाजी महाराज पुतळा ते गोकुळनगरी ते टाकळी नाका ( इंदीरा पथ ) या  चाळणी झालेल्या    खड्डेमय धुळयुक्त रोड चे काम कधी सुरू करणार .त्याच बरोबर पंचायत समिती बिल्डिंग ,ठोळे निवास ते आठरे बंगला यारोड ला खूप खड्डे पडले असून, फक्त तहसीलकचेरी परियन्त हा रोड केला असून पुढील रस्ता अर्धवट सोडून दिला आहे ,    कोणताच रोड  नीट व्यवस्थित करत नाही. शहर धुळमय झाले आहे,सकाळी आंघोळ करून बाहेर पडले की नागरिक संपूर्ण धुळीनी भरून जातो, जसे की आंघोळ केली की नाही,धुळीमुळे    श्वसनाचे व डोळ्याचे विकार होत आहे .या साठी जे डांबरी रोड झाले ,त्याच्या बाजूला लगेच साईड पट्टीला पेविंग ब्लॉक बसवून रोड चे काम लवकर पूर्ण केले पाहिजे, म्हणजे धूळ कमी होऊन जनतेला त्रास होणार नाही. धारणगावं रस्त्याचे काम हे खूप धीम्या गतीने चालू आहे , त्याचा  स्पीड वाढवला पाहिजे.त्याच बरोबर कोपरगाव मध्ये येण्यासाठीचा महत्वाचा रोड , बेट नाका ते तांडेलबंगला ते सोमय्या कॉलेज गेट ते मौंनगिरी ( छोटा पूल )या रस्त्याला खूप मोठे खड्डे पडले आहेत , कॉलेज मध्ये येता जाताना, कोपरगावात येताना , बाहेर जाताना , खूप त्रास जनतेला होत आहे , मान व कंबर दुखीचे त्रास होत आहे , दुचाकी मोटर सायकल , चार चाकी गाड्याचे कामे निघत आहे, निष्कारण जनतेला भुर्दंड बसत आहे,गावात येणाऱ्या या मुख्य रोड मुळे त्रास होऊन गावाचे नाव खराब होत आहे. नुसते मार्च एन्ड ला बिले काढण्या साठी काम न करता ते उच्च दर्जाचे झाले पाहिजे केले पाहिजे.नगरपालिकेची मुदत संपली असून कोणाला बोलावे हाच प्रश्न सर्वांना पडला आहे.खूप वर्षांपासून जनता या खड्ड्याचा व धुळीचा त्रास सहन करीत आहे .निधी आहेत याचा उपयोग ,नगरपालिका प्रशासनाने यात लक्ष घालून कामाचे स्पीड वाढवून , उच्च दरवाजाचे काम करून घेऊन जनतेला होणाऱ्या त्रासातून सुटकारा  द्यावा.असे मा.नगराध्यक्ष मंंगेश पाटील म्हणाले आहे

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे