धार्मिक

कोपरगाव बेट शुक्राचार्य देवस्थानच्या वतिने महाशिवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात होणार साजरा

संपादक:- रवींद्र जगताप

कोपरगाव प्रतिनिधी :-सालाबादप्रमाणे येणारा पवित्र महाशिवरात्रीचा उत्सव यंदा माघ वद्य चर्तुदशी शके १९४३ दिनांक १ मार्च २०२२ मंगळवार रोजी येत आहे. गेली दोन वर्षे संपूर्ण मानव जातीवर आलेल्या कोरोना-१९ या जागतीक महामारीच्या संकटामुळे आपला उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करता आला नाही. गुरु शुक्राचार्य महाराजांच्या कृपा आशिर्वादाने आलेल्या संकटाचे प्रमाण कमी झालेले असल्याने हा पवित्र उत्सव संपूर्ण धार्मिक पध्दतीने व नेहमीप्रमाणे साजरा करण्याचे मंदिर प्रशासनाने ठरविले आहे.दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अगदी कोरोना काळ असून सुध्दा मंदिरामध्ये प्रशासनाने पुढील नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेतले होते, त्याचे लोकार्पण व उद्घाटन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यामध्ये १. गुरू शुक्राचार्य महाराजांच्या वंशावळीची फ्रेम आकर्षक अशा महिरपीमध्ये बसविण्यात आली, २.गुरु शुक्रचार्य महाराजांच्या सेवेसाठी वापरण्यात आलेल्या पुरातण वस्तुंचे (सन १८५२ पासुनच्या पुरातण वस्तुंचे) आकर्षक असे संग्रहालय उभारले आहे. ३. गुरु शुक्राचार्य मंदिर या नांवाचा २४ फुटउंचीचा ग्लो साइन बोर्ड मंदिरावर हायवेच्या दिशेने दिसेल असा बसविला आहे, इत्यादी अनेक उपक्रम मंदिर प्रशासनाने हाती घेतलेले आहेत.

त्याचप्रमाणे महाशिवरात्रीनंतर येणाऱ्या रविवारी सर्व भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले जाते. याही वर्षी महाप्रसादाचे आयोजन दिनांक ०६/०३/२०२२ रविवार रोजी केले असून त्यासाठी लागणारा सर्व किराणा साहित्य पुणे येथील दानशुर श्री.हरिभाऊ कामठे व श्री. सूर्यकांत मुळीक, रा. फुरसुंगी, पुणे यांनी दिलेला आहे, त्यांचे संस्थेच्या वतीने जाहीर आभार व्यक्त करण्यात येत आहे.तसेच ट्रस्टचे अध्यक्ष श्री. बाळासाहेब आव्हाड यांनी गुरु शुक्राचार्य महाराजांवर तसेच मंदिराची माहिती सांगणारे ‘शुक्रतीर्थ या पुस्तकाचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे विश्वस्त मा. अॅड. एस. डी. कुलकर्णी, मा.अॅड.जी. व्ही. कोन्हाळकर, मा. श्री. सुहास कुलकर्णी, मा.श्री. हेमंत पटवर्धन संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.बाळासाहेब म्हाळुजी आव्हाड, तसेच स्थानिक कमिटी मेंबर- श्री. सचिन परदेशी, श्री. प्रसाद पन्हे, श्री. राजेंद्र (मुन्ना) आव्हाड, श्री. भागचंद रुईकर, श्री. विशाल राऊत, श्री. बाळासाहेब लकारे, श्री. बाहासाहेब गाडे, श्री. मधुकर साखरे, श्री. संजय वडांगळे, श्री. भाऊसाहेब आव्हाड, श्री. नरेंद्र आव्हाड, श्री. महेंद्र नाईकवाडे, श्री. विलास आव्हाड, श्री. आदिनाथ ढाकणे, श्री. विजयराव रोहम, श्री. दिलीपराव सांगळे, श्री. रविंद्र आढाव, श्री. विलास आव्हाड, श्री. तुषार आव्हाड,मा.शहरप्रमुख सनी वाघ श्री. विकास शर्मा, मंदिर व्यवस्थापक श्री. राजाराम पावरा, मंदिराचे पुजारी व नागरीक उपस्थित होते.यावेळी उपस्थितांना मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड,अनिल सोनवणे, सुशांत घोडके,पत्रकार सोमनाथ सोनपसारे यांनी मार्गदर्शक केले,राहता येथून आलेले भाविक लुटे यांनी नर्मदा परिक्रमे बरोबर गोदावरी परिक्रमेची कल्पना मांडली.गोदावरी परिक्रमा सुरु झाल्यास कोपरगावच्या मंदिरांना महत्व प्राप्त होईल.या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सचिन परदेशी यांनी केले तर उपस्थीतांचे आभार एस.एल.कुलकर्णी यांनी मानले  आहे

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे