कोपरगाव नगरपरिषद निवडणुकी करता सौ. मनीषा संतोष दळवी यांनी प्रभाग क्र १३ मधून केला अर्ज दाखल
कोपरगाव नगरपरिषद निवडणुकी करता सौ. मनीषा संतोष दळवी यांनी प्रभाग क्र १३ मधून केला अर्ज दाखल
कोपरगाव:- कोपरगावात नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्वच राजकीय पक्षांनी हालचाली सुरु केल्या आहेत. गाठी भेटी दौरे सुरु केले आहेत. . कोपरगाव शहरामध्ये अनेक उमेदवार सध्या अर्ज दाखल करताना दिसत आहे.आज १६ नोव्हेबर २०२५ रोजी

कोपरगाव नगरपरिषद निवडणुकी करता सौ मनीषा संतोष दळवी यांनी प्रभाग क्रमांक १३ ब सर्व साधारण महिला मधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे सौ. मनीषा संतोष दळवी यांनी प्रभाग क्रमांक १३ मधून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर, त्यांनी प्रभागाच्या सर्वागीण विकासासाठी प्रयत्न करण्याचा संकल्प व्यक्त केला आहे. आणि प्रभागाच्या विकासासाठी काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. कोपरगाव नगरपरिषदेच्या निवडणुकीची रंगत दिवसेंदिवस वाढत असताना, मनिषा संतोष दळवी हे प्रभाग क्रमांक १३ मधून संतोष दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली उमेदवारी करणार आहे यांच्या उमेदवारीला नागरिकांची पसंती असुन तसेच प्रभागात उत्साहाचे वातावरण आहे.प्रभागातील नागरिकांनी आणि महिलांनी “मनीषा दळवी हे खरे प्रतिनिधी आहेत. अशी त्यांची प्रभागात चर्चा असुन प्रामाणिक नेतृत्वाची सध्या प्रभागाला गरज असुन त्यांचे नाव समोर आले ही प्रभागासाठी अभिमानाची बाब आहे,” अशी प्रतिक्रिया जनतेतून येत आहे. सौ. मनीषा संतोष दळवी यांनी प्रभाग क्रमांक १३ मधून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रभाग क्रमांक १३ मध्ये चुरस निर्माण होणार आहे .




